कर्नाटक: रेल्वे परीक्षेला येण्यापूर्वी मंगळसूत्र, जानवे काढून ठेवण्यावरून वाद

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांनी केला हस्तक्षेप

कर्नाटक: रेल्वे परीक्षेला येण्यापूर्वी मंगळसूत्र, जानवे काढून ठेवण्यावरून वाद

कर्नाटकातील एका सीईटी परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना जानवे आणि हातातील धागा काढण्यास भाग पाडल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले होते. संबंधित परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांविरूद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. यानंतर आता कर्नाटकमध्ये असाच एक वाद समोर आला आहे. रेल्वे विभागाच्या नर्सिंग अधीक्षकांच्या प्रवेश परीक्षेवरून हा वाद सुरू झाला आहे.

उमेदवारांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी मंगळसूत्र आणि जानवे यासारखी धार्मिक चिन्हे काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यामुळे वाद निर्माण झाला होता. प्रवेशपत्रातील सूचनांनुसार, उमेदवारांना संगणक-आधारित परीक्षेला बसताना मंगळसूत्र, कानातले, नाकाच्या पिन, अंगठी, बांगड्या आणि जानवे हे घालण्यास मनाई आहे. दरम्यान, विश्व हिंदू परिषदेने (VHP) या निर्णयावर आक्षेप घेतला. रेल्वेच्या नर्सिंग अधीक्षक पदासाठीच्या परीक्षेदरम्यान उमेदवारांना मंगळसूत्र सारखी धार्मिक प्रतीके काढून टाकण्याची सूचना मागे घेण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेने केली. त्यांनी म्हटले आहे की, “यामुळे कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावतील. अशी हिंदूविरोधी धोरणे सहन केली जाणार नाहीत.”

यानंतर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांनी हस्तक्षेप केला आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना अशा कोणत्याही कारवायांमध्ये सहभागी होऊ नयेत असे निर्देश दिले आहेत. ही परीक्षा २९ एप्रिल रोजी मंगळुरू येथील बोंडेल येथील मानेल श्रीनिवास नायक बेझंट विद्या केंद्रात होणार आहे.

हे ही वाचा : 

“दहशतवाद्यांकडे धर्म विचारून मारण्याइतका पुरेसा वेळ नाही”

सिंधू नदीतून भारतीयांचे रक्त वाहिले तर पाकिस्तानींचे रक्तही वाहील

सलग चौथ्या दिवशी पाकिस्तानकडून एलओसीवर शस्त्रसंधीचे उल्लंघन

घाटकोपर: सोमय्यांच्या तक्रारीनंतर मुस्लीम जमात गौसिया मशिदीचे भोंगे उतरवले!

यापूर्वी महिन्याच्या सुरुवातीला कर्नाटक कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (सीईटी) दरम्यान अशाच प्रकारच्या तक्रारी आल्या होत्या. सीईटी परीक्षेसाठी केंद्रावर आलेल्या तीन विद्यार्थ्यांना हातात धागा आणि जानवे घातल्याने बाहेरच थांबवण्यात आले होते. त्यातील दोन मुलांनी जानवे आणि हातातला धागा काढला, मात्र एक विद्यार्थ्याने जानवे काढण्यास नकार दिला. तेव्हा त्याला १५ मिनिटांपर्यंत बाहेरच थांबवण्यात आले. अखेर त्याच्या हातातील धागा काढला, मात्र जानवे ठेवूनच त्याला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला. या घटनेची माहिती मिळताच लोकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या. यानंतर, संबंधित परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

भारतमाता की जय नको! पाकिस्तान झिंदाबाद हवे ?  | Mahesh Vichare | Pahalgam Attack |

Exit mobile version