जगन्नाथाच्या रथयात्रेला प्रारंभ

जगन्नाथाच्या रथयात्रेला प्रारंभ

ओडिशाचे प्रमुख आकर्षण असलेल्या जगन्नाथ पुरीच्या रथयात्रेला आजपासून प्रारंभ होत आहे. रथयात्रेचे हिंदू धर्मात महत्त्वाचे स्थान आहे. या यात्रेच्या प्रारंभाच्या निमित्ताने राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विविध मंत्र्यांनी ट्वीट करून रथयात्रेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याबरोबरच विविध मंत्र्यांनी देखील ट्वीट केली आहेत.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील ट्वीट करताना म्हटले आहे,

“भगवान जगन्नाथाच्या रथ यात्रेच्या शुभ दिनी सर्व देशवासीयांना आणि विशेषतः ओडिशातील धार्मिकांना माझ्यकडून हार्दिक शुभेच्छा! मी प्रार्थना करतो की जगन्नाथाच्या आशीर्वादाने सर्वांचे आयुष्य सुखी समाधानी आणि आरोग्यपूर्ण जावो.”

हे ही वाचा:

१५ ऑगस्ट पूर्वी उत्तर प्रदेशात करायचे होते बॉम्बस्फोट

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांची टगेगिरी सुरू आहे

उत्तर प्रदेश एटीएसने उधळला अल कायदाचा कट…दोन दहशतवादी अटकेत

दहशतवाद्यांना मदत कराल तर याद राखा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करताना म्हटले आहे,

“सर्वांना रथयात्रा दिनाच्या शुभेच्छा! भगवान जगन्नाथाला मी वंदन करतो आणि सर्वांच्या आयुरारोग्यासाठी प्रार्थना करतो. जय जगन्नाथ”

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देखील याबाबत ट्वीट केले आहे. ते म्हणतात,

“भगवान जगन्नाथाच्या रथ यात्रेच्या सर्व देशवासियांना शुभेच्छा. या शुभ दिनी मी जगन्नाथाकडे सर्व देशवासियांच्या कुशलतेसाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थना करतो. जय जगन्नाथ”

नव्यानेच केंद्रीय नागरी विमान मंत्रालयाचा पदभार स्विकारलेल्या ज्योतिरादित्य सिंदिया यांनीदेखील ट्वीट केले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे,

“भगवन जगन्नाथाच्या रथयात्रेच्या पवित्र दिनी तुम्हा सर्वांना शुभेच्छा! महाप्रभू जगन्नाथ आपले सर्वांचे आयुष्यात सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्य यांनी परिपूर्ण करो ही प्रार्थना”

Exit mobile version