पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील शमशेरगंज ब्लॉकमधील धुलिया शहरामध्ये ११ व १२ एप्रिल रोजी मुस्लिम जमावाने केलेल्या हिंसाचारानंतर हिंदू समाजाचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे. भाजप नेते अर्जुन सिंह यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, शेकडो हिंदू गंगा नदी ओलांडून बोटीने मालदा जिल्ह्यातील लालपूर शहरात जाताना दिसत आहेत. “आमचे हिंदू भाऊ आणि बहिणी जीव वाचवण्यासाठी येथे येत आहेत,” असे त्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती म्हणताना ऐकू येते.
दुसरा एक व्यक्ती आश्वासन देतो, “तणाव घेऊ नका, तुमच्यासाठी निवाऱ्याची आणि जेवणाची व्यवस्था केली आहे.” आतापर्यंत ४०-५० बोटींच्या साहाय्याने हजारो हिंदूंना धुलियानहून सुरक्षितपणे हलवण्यात आले आहे. एका वृद्ध महिलेने रडत रडत सांगितले की, “सगळं जाळून टाकलं… फक्त आमच्या (हिंदूंच्या) घरांनाच लक्ष्य केलं.” या दंगलींनंतर स्थलांतर करणारे अनेक हिंदू पुरुष आणि महिला दुःखी झालेल्या आहेत. एका महिलेनं सांगितलं, “मोदींनी बिल पास केलं म्हणून आम्हाला येथे राहू देणार नाही असं त्यांनी सांगितलं.”
मुस्लिम बहुसंख्य असलेल्या या भागात शुक्रवारी (११ एप्रिल) झालेल्या जुम्मा नमाजनंतर आंदोलनाच्या आडून हिंसाचार झाला. ‘सुभा स्मृती हॉटेल’ नावाच्या एका हिंदू दाम्पत्याच्या मिठाईच्या दुकानाला जाळण्यात आले आणि लुटण्यात आले.‘श्री हरि हिंदू हॉटेल & लॉज’ देखील उद्ध्वस्त करण्यात आले. काही मंदिरांवर हल्ले करून मूर्तींची तोडफोड केल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
भारतात आयफोनचे उत्पादन ६० टक्क्यांनी वाढले
बंगालमध्ये हिंदू सुरक्षित नाहीत!
चिदंबरम यांनीच नष्ट केला होता २६/११ प्रकरणातील एक महत्वाचा दुवा
आधी क्षत्रिय समाजाचा अपमान, आता कांशीराम यांची खिल्ली
पोलिसच गैरहजर
हल्ल्यावेळी पोलिस कोठेच नव्हते, अशी तक्रार स्थानिकांनी केली. ऍम्ब्युलन्स जाळून टाकण्यात आली आणि तिचा चालकही मारहाणीत गंभीर जखमी झाला. सीसीटीव्ही फूटेजमध्ये मुस्लिम युवक हिंदू कुटुंबाच्या वाहनांची तोडफोड करताना दिसत आहेत. भाजप नेते अर्जुन सिंह यांनी ममता बॅनर्जी सरकारवर टीका करत सांगितले की, “बांगलादेशात हिंदूंवर पूर्वी हल्ले झाले, आता हेच पंथीय मूळ पश्चिम बंगालमध्ये हल्ले करत आहेत.” त्यांनी राज्य सरकारवर ‘ग्रेटर बांगलादेश’च्या अजेंड्याला चालना देण्याचा आरोप केला आणि संतान धर्मीय एकतेचा आवाहन केला.
२०२१च्या निवडणूक परिणामानंतर आणि २०२३च्या पंचायत निवडणुकांनंतर पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंदू समाजाच्या विरोधात हिंसा झाली. भाजप नेते जे. पी. नड्डा यांनी सांगितले होते की, जवळपास ८०,००० ते १ लाख हिंदूंना त्यांच्या घरांमधून पळावे लागले होते.