हिंदू नववर्षाच्या भव्य स्वागतासाठी हिंदवी एकता मंचच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन

हिंदू संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

हिंदू नववर्षाच्या भव्य स्वागतासाठी हिंदवी एकता मंचच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन

हिंदूंसाठी गुढीपाडवा म्हणजे नव वर्षाची सुरुवात. चैत्र शुद्ध प्रतिपदा या तिथीला हिंदू नव वर्षाची सुरुवात होते. दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही हिंदू बांधवांमध्ये नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठा उत्साह असून अनेक ठिकाणी शोभायात्रांचे, भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. असेच हिंदू समाजासाठी गौरवशाली आणि आनंदाचा दिवस असलेल्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर, हिंदवी एकता मंचच्या वतीने भव्य हिंदू नववर्ष शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

यंदा युगाब्द ५१२७, शालिवाहन शके १९४७, विक्रम संवत २०८२ प्रारंभ होत असून, चैत्र शुद्ध प्रतिपदा ही तिथी हिंदू धर्मीयांसाठी नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. याच दिवशी प्रभू श्रीरामाचे अयोध्या आगमन, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची गुढी उभारली, अशा अनेक ऐतिहासिक स्मृतींना उजाळा देणारा हा पर्वदिन आहे. हिंदू नव वर्षाचे भव्य स्वागत करण्यासाठी हिंदवी एकता मंचच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार, ३० मार्च २०२५ रोजी सकाळी ८:०० वाजता औदुंबर मंदिर समता काम्प्लेक्स मालवणी येथे शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी पारंपारिक वस्त्रे परिधान करून शोभायात्रेत सहभागी होण्याचे आवाहन हिंदवी एकता मंचच्या वतीने करण्यात आले आहे. शोभायात्रेची सुरुवात गुढी पूजन, ध्वज वंदन श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू धर्मवीरांच्या प्रतिमांचे पूजन करून होईल. यानंतर लेझीम पथक, ढोल-ताशा पथकांचे सादरीकरण, भगवा ध्वज आणि पारंपरिक वेशभूषेतील भव्य रॅली, महिला व मुलींचा विशेष सहभाग, वारकरी मंडळींचा सहभाग हे शोभायात्रेचे विशेष आकर्षण असणार आहे.

हे ही वाचा..

सुकमा कारवाई : अमित शाह म्हणाले, नक्षलवादावर आणखी एक प्रहार!’

राहुल गांधी कधीच कुटुंबाच्या घरट्याबाहेर पडू शकणार नाहीत

कुणाल कामराच्या अडचणी वाढल्या, खार पोलिसांकडे आणखी तीन गुन्हे दाखल

काश्मीरमधील बडगाममध्ये पॅलेस्टाईन समर्थक रॅलीचे आयोजक, सहभागींवर गुन्हा दाखल

ही शोभायात्रा राजकीय, जातीय किंवा कोणत्याही वादापासून दूर राहून हिंदू एकता आणि संस्कृतीच्या जतनासाठी आयोजित करण्यात येत आहे. त्यामुळे सर्व भाविकांनी संयम आणि शिस्त पाळून या सोहळ्याचा आनंद घ्यावा असे विशेष आवाहन हिंदवी एकता मंचच्या वतीने करण्यात आले आहे.

दिनांक: रविवार, ३० मार्च २०२५

वेळ: सकाळी ८ वाजता

स्थळ: औदुंबर मंदिर समता काम्प्लेक्स मालवणी

सतीश सालियन यांना बकरा बनवण्याची तयारी होती...| Dinesh Kanji | Disha Salian | Satish Salian

Exit mobile version