28 C
Mumbai
Monday, March 31, 2025
घरधर्म संस्कृतीसाडेचार महिने मी फक्त एकदाच जेवतो!

साडेचार महिने मी फक्त एकदाच जेवतो!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितला फिटनेसचा मंत्र

Google News Follow

Related

वर्षा ऋतूत पचनक्रियेची शक्ती कमी झालेली असते. त्या ऋतूत मी एक वेळा जेवतो. म्हणजे दिवसभरात फक्त एकदाच जेवतो. जून महिन्यापासून हे सुरू होतं. नोव्हेंबरपर्यंत मी एक वेळ जेवतो. म्हणजे साडेचार महिन्यात मी एक वेळ जेवतो. त्यानंतर नवरात्रीत दुर्गा पूजा असते. नऊ दिवसाचा हा उत्सव असतो. तेव्हा मी रोज गरम पाणी पितो. तसंही गरम पाणी पिण्याची माझी सवय आहे. मार्च एप्रिल महिन्यात नवरात्री येते. आमच्याकडे तिला चैत्री नवरात्री म्हणतात. यंदा ३१ मार्चला सुरु होते. त्या नऊ दिवसात मी दिवसाला एक फळ खातो. फक्त एकच फळ खातो. म्हणजे एकदा पपई खाल्ली तर नऊ दिवस पपईच खातो. दुसरं फळ खात नाही. गेल्या ५५ वर्षापासून मी हे करतोय, अशा शब्दात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शिस्तबद्ध जीवनशैलीबाबत सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेक्स फ्रिडमॅनसोबत केलेल्या पॉडकास्टमध्ये आपल्या जीवनावर भाष्य केले. आपण उपवास का करतो? त्या काळात मनात काय विचार येतात? यावर मोदींनी मनमोकळेपणाने सांगितले. भारतात आमच्या धार्मिक परंपरा वास्तवात जीवन जगण्याची एक पद्धत आहे, असेही मोदी म्हणाले.

हे ही वाचा:

औरंग्याची खुलताबाद येथील कबर “राष्ट्रीय वारसा” म्हणून जतन करायची का ?

भारतीय संरक्षण उद्योगाची गरुडभरारी

नाय नो नेव्हर! दिल्ली टीमवर मानसिक दबाव नाही…

कर्नाटक सरकारची हमी निरर्थक, कसलीही अंमलबजावणी नाही

मोदींनी सांगितले की, आमच्या शास्त्रांमध्ये शरीर, मन, बुद्धी, आत्मा आणि मानवतेला उच्च स्तरावर नेण्याची गहन चर्चा आहे. ती मिळवण्यासाठी विविध मार्ग, परंपरा आणि प्रणालींची रुपरेषा तयार होते. उपवास त्यापैकीच एक आहे. पण उपवास म्हणजे सर्वकाही नाही. भारतात तुम्ही याला सांस्कृतिक अंगाने पाहा वा दार्शनिक अंगाने, कधी कधी मला असं वाटतं उपवास हे शिस्तबद्धता विकसित करण्याची एक पद्धती आहे.
मोदी म्हणाले की, उपवासात प्रत्येक इंद्रीय, खासकरून गंध, स्पर्श आणि स्वाद अत्यंत संवेदनशील होतात. तुम्हाला पाण्याच्या सुक्ष्म गंधाचीही जाणीव होते.

ते म्हणाले, उपवासामुळे विचाराची प्रक्रिया अधिक तेज होऊ शकते. त्यामुळे एक नवा दृष्टीकोण मिळतो. तुम्ही चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करता. प्रत्येकाला हा अनुभव येतो की नाही मला माहीत नाही. पण मला निश्चितपणे हा अनुभव येतो.
जेव्हा मी उपवास सुरू करतो, तेव्हा ते माझ्यासाठी भक्तीचं कार्य असतं. उपवास आत्म अनुशासनाचं रुप आहे. माझ्यासाठी व्यक्तिगत रित्या, जेव्हा मी उपवासा दरम्यान दैनिक गोष्टी करत असतो, तेव्हा माझं मन अत्यंत गहनपणे आत्मनिरीक्षण करू लागतं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
239,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा