सिंधुदुर्गातील सिंधुदुर्ग किल्ला, पद्मदुर्ग किल्ला, राजकोट किल्ला आणि सर्जेकोट किल्ला या किल्ल्यांचा अभ्यास करण्यासाठी मुंबई विद्यापिठात स्वतंत्र अध्यासन केंद्र चालू करण्याबाबतीत सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी
योजना जाहीर केली. त्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ५० लाखाचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा अॅड. आशिष शेलार यांनी आज येथे केली.
सिंधुदुर्ग किल्ल्याला १२ एप्रिलला ३५८ वर्षे पूर्ण झाली त्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला होता. यासाठी अॅड. शेलार यांनी भेट दिली आणि ते मंदिरामध्ये राजांच्या चरणी नतमस्तक झाले.
सिंधुदुर्ग किल्ला, पद्मदुर्ग किल्ला, राजकोट किल्ला आणि सर्जेकोट किल्ला या चार किल्ल्यांबद्दल खूप मोठ्या प्रमाणात अजूनही माहिती जनतेसमोर येणं आवश्यक आहे, अजूनही या किल्ल्याबद्दलचा अभ्यास होणं आवश्यक आहे. या विषयासंदर्भात सर्व कागदपत्र जमा करावे लागतील आणि त्यावर अभ्यास करावा लागेल. व्यापाराचं बेट याठिकाणी होतं, त्याबाबातचे ऐतिहासिक दस्तावेज आहेत. म्हणून संस्कृतिक विभागाकडून मुंबई विद्यापिठाला सिंधुदुर्ग किल्ला, पद्मदुर्ग किल्ला, राजकोट किल्ला आणि सर्जेकोट किल्ला या चारही किल्ल्यांच्या अभ्यासासाठी एक अध्ययन केंद्र आणि त्यासाठी ५० लाख रुपयांची व्यवस्था करणी येत असल्याचे आज त्यांनी घोषित केले.
हे ही वाचा:
तृणमूल काँग्रेस म्हणते, सीमासुरक्षा दलाच्या मदतीने मुर्शिदाबादेत दंगल!
आक्रमणकर्त्यांनी आपल्या मतभेदांचा फायदा घेतला
सलमान खानला पुन्हा धमकी, घरात घुसून ठार मारू!
… तर मुस्लिम तरुणांना पंक्चर दुरुस्तीचे काम करावे लागले नसते
त्याचा जीआर काढून जास्तीत जास्त युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी, देश घडवावा, राज्य घडवावं आणि त्याचा अभ्यास करावा. हा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या खिशातून कुठलाही निधी न जाता ही प्राथमिक सुविधा आपण घोषित करतो आहोत, असे सांस्कृतिक मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी सांगितले.
यावेळी त्यांच्यासोबत सिंधुदुर्ग जिल्याचे पालकमंत्री नितेश राणे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर आणि भाजपा प्रदेश सचिव प्रमोद जठार, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत उपस्थित होते.