मध्य प्रदेशमधील एका व्यक्तीने हिंदू धर्मात घरवापसी केली आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर दुःख झाल्यामुळे या व्यक्तीने हिंदू धर्मात घरवापसी केली आहे. तसेच केवळ हिंदू धर्मात परतले नसून त्यांनी दर्गा परिसरात सुंदरकांड पठणही केले.
मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक अनोखी घटना समोर आली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या घटनेमुळे दुःखी झालेल्या कुलकर्णी नगर येथील एका रहिवाशाने हिंदू धर्मात परतण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय त्यांनी हिंदू धर्माचा स्वीकार केल्यानंतर दर्गा परिसरात सुंदरकांड पठणही केले.
श्यामलाल निनोरी हे गेल्या ४० वर्षांपासून सय्यद निजामुद्दीनच्या दर्ग्याची सेवा करत होते. हा दर्गा ग्वाल्हेर ऑइल मिलच्या जमिनीवर बांधली असून या काळात स्थानिक लोकांनी त्यांना मुस्लिम मानले आणि त्याचे नाव शहाबुद्दीन ठेवले. श्यामलाल देखील स्वतःला शहाबुद्दीन मानू लागले. शहाबुद्दीन आणि त्याचे कुटुंब मुस्लिमांप्रमाणे उपवास ठेवत होते, नमाज अदा करत होते आणि इस्लामच्या सर्व धार्मिक श्रद्धांचे पालन करत होते. दर्ग्यात उरूस आयोजित केला जात होता आणि लोक त्यांना दर्गा वाले बाबा या नावानेही ओळखतात.
हे ही वाचा:
भाजपचे राजा इक्बाल दिल्लीचे महापौर; काँग्रेस उमेदवाराला फक्त ८ मते
पाकिस्तानी नागरिकांना ओळखून परत पाठवून द्या!
प. बंगालच्या आसनसोलमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा
मानहानी खटला प्रकरणी मेधा पाटकर यांना अटक
स्थानिक नगरसेवक जितू यादव यांनी सांगितले की, श्यामलाल यांनी पूर्वी महानगरपालिकेचे कर्मचारी असल्याने सरकारी कागदपत्रांमध्ये त्यांचे नाव बदलले नाही, परंतु दर्ग्यामध्ये केलेल्या सेवेमुळे गेल्या ४० वर्षांपासून लोक त्यांना मुस्लिम मानू लागले होते. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे अलिकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक हिंदू कुटुंबांचा मृत्यू झाल्यानंतर श्यामलाल यांचे मन बदलले. यानंतर नगरसेवक जितू यादव यांच्या पुढाकाराने त्यांनी हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. यानंतर, श्यामलाल यांनी दर्गा परिसरात कव्वाली ऐवजी सुंदरकांड पठणाचे आयोजन केले आणि पहलगाम अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी नगरसेवक जितू यादव यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.