पाकिस्तानात विकत आहे, विदेशी शस्त्रांच्या ‘फर्स्ट कॉपी’ अगदी स्वस्तात!

अतीकच्या हत्येनंतर ही शस्त्रे उपलब्ध असल्याची माहिती आली समोर

पाकिस्तानात विकत आहे, विदेशी शस्त्रांच्या ‘फर्स्ट कॉपी’ अगदी स्वस्तात!

मेड इन तुर्की जिगाना पिस्तुलाची किंमत १० लाखापर्यंत आहे असे म्हटले जाते पण या गुन्हेगारांकडून वापरल्या जाणाऱ्या या पिस्तुलाची किंवा तत्सम विदेशी शस्त्रांची फर्स्ट कॉपी आता उपलब्ध आहे. ही पहिली प्रत अन्यत्र कुठे नाही तर दहशतवादाचे केंद्र असलेल्या पाकिस्तानात बनते आहे.

१५ एप्रिलच्या रात्री प्रयागराज येथे कुख्यात गुंड अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ याची तिघांनी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेत वापरण्यात आलेल्या पिस्तुलेचे नाव जिगाना असे आहे. तेव्हा जिगानाची चर्चा सुरू झाली.
पण अतीकच्या हत्येसाठी वापरलेली ही विदेशी बनावटीची पिस्तुल ही फर्स्ट कॉपी असू शकते असा दावा करण्यात येत आहे. गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हेगार ५ ते १० लाख रुपयांना विकत घेत असलेले मेड इन तुर्की जिगाना पिस्तूल ही पहिली प्रत असू शकते. हे शस्त्र पाकिस्तानात तयार केले जात आहे.

हे ही वाचा:

राज्यातील शाळेची घंटा १५ जूनला वाजणार

राज्याच्या कारागृहातील कैद्यांवर असेल आता ड्रोन कॅमेऱ्यांची करडी नजर

येमेनमध्ये आर्थिक मदतीच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी ८० पेक्षा जास्त लोक ठार ठार, १००जखमी

कुत्र्यांनाही मिळाला स्थानिक अधिवासाचा हक्क, त्यांच्या परिसरातून हाकलता येणार नाही

गुन्हेगारांकडून जप्त करण्यात आलेल्या पिस्तुलांच्या तपासानंतर असे आढळले की अशी अनेक पिस्तुले पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये तयार केली गेली आहेत. सखोल चौकशी केली असता ‘.पीके’ विस्तार असलेल्या अनेक संकेतस्थळे आणि ब्लॉगवर अशी फर्स्ट कॉपी शस्त्रे विक्रीसाठी ठेवल्याचे समोर आले. त्याचबरोबर त्यांची किंमतही अत्यंत कमी आहे. वापरलेले आणि स्थानिक पातळीवर तयार केलेले जिगाना एफ-९ एमएम पाकिस्तानी चलनात १७,000 रुपयांना (किंवा भारतीय चलनात ५,000 रुपयांपेक्षा कमी) विकले गेले. त्याचवेळी ९३ हजार ते दीड लाख रुपयांच्या चलनात नवीन शस्त्र विकले जात आहे.

खैबर पख्तुनख्वामधील कोहाट जिल्ह्यातील दरिया आदम आणि बलुचिस्तानमधील बरखान जिल्ह्यातील शस्त्रबाजारात ही ‘पहिली प्रत’ तयार केली जात असल्याची माहिती गुप्तचर सूत्रांनी दिली. इस्लामाबादपासून १७५ किमी अंतरावर असलेले दर्रा आदम खेल अनेक दशकांपासून अवैध शस्त्रनिर्मितीसाठी ओळखले जाते. जगभरात उपलब्ध असलेल्या जवळजवळ प्रत्येक शस्त्राची पहिली प्रत इथल्या हजारो दुकानांमध्ये विकली जाते.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचा एक प्रमुख क्लायंट आयएसआय होता, जो ड्रग्जसह महागड्या पिस्तुलांची पहिली प्रत भारतात पाठवत होता.ज्या कौशल्याने ही पिस्तुले बनवली जातात, त्यावरून भारतातील गुंड किंवा इतर जाणकारव्यक्तीला ती खरी आहे की पहिली प्रत, हे ओळखणे अशक्य आहे. ही शस्त्रे तपास यंत्रणांनी जप्त केल्यावरच फरक कळेल.

जिगाना पिस्तूलला एवढी गुंडांची पसंती का ?

जिगाना एक सेमी ऑटोमेटिक पिस्तूल आहे, ज्याची निर्मिती तुर्की शस्त्रउत्पादन कंपनी टीसासने (Tisas) केली आहे. २००१ साली या पिस्तूलची निर्मिती करण्यात आली. या पिस्तूलची १६ वेगवेगळी मॉडेल्स बाजारात उपलब्ध आहेत. पिस्तूलच्या सुरक्षेसाठी ऑटोमेटिक फायरिंग पिन ब्लॉक दिलेला आहे. आशियातील अनेक देशांतील गँगस्टरांसह चार देशांमधील पोलीस आणि सैन्य या पिस्तूलचा अधिकृत वापर करत आहेत. मलेशिया, तुर्की आणि फिलिपिन्स या देशांत या पिस्तूलचा अधिकृत वापर केला जातो.अमेरिकेतील कोस्टल गार्डदेखील मर्यादित स्वरूपात या पिस्तूलचा वापर केला आहे. जिगाना स्पोर्ट हे नव्याने निर्मिती करण्यात आलेले मॉडेल आहे. वापरण्यासाठी अतिशय सोपे आणि वजनाने हलके असल्यामुळे जिगानाला पसंती दिली जाते.

जिगाना पिस्तूल भारतात विकण्यावर निर्बंध आहेत. माध्यमांमध्ये आलेल्या बातमीनुसार पाकिस्तानमध्ये या पिस्तूलनिर्मितीचे बेकायदेशीर कारखाने आहेत. दहशतवाद्यांना आणि काळ्या बाजारात या पिस्तूल विकल्या जातात. अतिक अहमदच्या मारेकऱ्यांकडे हे पिस्तूल कुठून आले? याचा शोध अद्याप लागलेला नाही. पण पाकिस्तानच्या सीमेमधून या पिस्तूलची तस्करी केली जाते, त्यामुळे याचा संबंध पाकिस्तानशी जोडण्यात येत आहे. जिगाना पिस्तूलची अनेक मॉडेल्स असून त्यात वजन, आकार, बॅरेलची लांबी, मॅगझीन क्षमता वेगवेगळी आहे. अतिक अहमदच्या हत्येसाठी कोणते मॉडेल वापरण्यात आले याचीही माहिती अद्याप मिळालेली नाही.

Exit mobile version