29 C
Mumbai
Tuesday, November 19, 2024
घरक्राईमनामाबाबा सिद्दिकी यांच्यासोबत झीशान सिद्दिकीही होते टार्गेटवर

बाबा सिद्दिकी यांच्यासोबत झीशान सिद्दिकीही होते टार्गेटवर

पोलिसांनी दिली माहिती

Google News Follow

Related

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या झाली. यानंतर या प्रकरणाच्या तपासादरम्यान आरोपींनी उघड केले की, बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान सिद्दीकी हा देखील नेमबाजांच्या लक्ष्यावर होता. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना झीशान आणि बाबा सिद्दीकी या दोघांना ठार मारण्याचे कंत्राट देण्यात आले होते.

या प्रकरणातील आरोपींनी चौकशीदरम्यान दावा केला की, झीशान आणि बाबा सिद्दीकी दोघेही त्यांच्या निशाण्यावर होते. शिवाय कोणीही सापडेल त्याच्यावर गोळीबार करण्याचे आदेश देण्यात आले होते. बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान सिद्दीकी याला घटना घडण्याच्या काही दिवसांपूर्वी धमक्या आल्या होत्या. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकीच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी प्रवीण लोणकर याला पुण्यातून अटक केली आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण हा शुभू लोणकरचा भाऊ असून त्याने सोशल मीडियावर लॉरेन्स बिश्नोई टोळीने हत्येची जबाबदारी घेतल्याची पोस्ट केली होती. शुभू लोणकर हा सध्या फरार असून अटक केलेल्या दोन्ही आरोपींना प्रवीण लोणकर याने पुण्यात आश्रय दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकीच्या हत्येतील आरोपी धर्मराज कश्यपची ओसीफिकेशन चाचणी मुंबई पोलिसांनी घेतली आणि तो अल्पवयीन नसल्याची पुष्टी झाली, असे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले.

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीक यांची निर्मल नगर येथील कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांना तातडीने मुंबईच्या लीलावती रुग्णालयात नेण्यात आले होते. परंतु रुग्णालयात नेण्यापूर्वी बंदुकीच्या गोळीमुळे त्यांना अनेक जखमा झाल्या होत्या आणि शनिवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर रविवारी मुंबईत बडा कब्रस्तान येथे पूर्ण शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले.

हे ही वाचा :

नेमबाज स्वप्निल कुसाळेला २ कोटी रुपये तर गोळाफेकपटू सचिन खिलारीला ३ कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द!

उद्धव ठाकरेंवर अँजिओप्लास्टी

मुंबईहून उड्डाण करणाऱ्या एअर इंडियासह इंडिगोच्या दोन विमानांना बॉम्बची धमकी

महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठास ‘रतन टाटां’चे नाव!

यावर भाष्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची घटना दुर्दैवी आणि दुःखद आहे. मुंबई पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. एक उत्तर प्रदेश आणि दुसरा हरियाणातूनआहे. ते बिष्णोई टोळी किंवा अंडरवर्ल्ड टोळी कोणाचेही असो त्यांना सोडले जाणार नाही. कठोर कारवाई केली जाईल. ज्यांना धमक्या येत असतील त्यांच्या सुरक्षेची खात्री केली जाईल, कारण ही राज्य सरकारची जबाबदारी आहे,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
192,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा