राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे खळबळ उडाली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. झिशान सिद्दिकी यांना ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितली आहे.
माहितीनुसार, बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर आता त्यांचा मुलगा झिशान सिद्दिकी यांना ठार मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. झिशान सिद्दिकी यांना ईमेलवरुन जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. डी कंपनीच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे. धमकी आल्यानंतर, पोलिसांचे पथक झिशान सिद्दिकी यांचा जबाब नोंदवण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले असून झिशान सिद्दिकी यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.
धमकीच्या ईमेलमध्ये असे म्हटले आहे की, झिशान यांनाही त्यांच्या वडिलांप्रमाणेच मारले जाईल. तसेच मेलमधून १० कोटी रुपयांची मागणीही करण्यात आली आहे. पाठवणाऱ्याने पुढे सांगितले की तो दर सहा तासांनी असे ईमेल पाठवेल. दरम्यान, एएनआयशी बोलताना सिद्दीकी यांनी दावा केला की, त्यांना मिळालेला धमकीचा ईमेल डी कंपनीकडून पाठवण्यात आला होता आणि त्यांनी १० कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. “मला डी कंपनीकडून मेलद्वारे धमकी मिळाली, मेलच्या शेवटी नमूद केल्याप्रमाणे, त्यांनी १० कोटी रुपयांची खंडणी मागितली. पोलिसांनी तपशील घेतला आहे आणि जबाब नोंदवला आहे. यामुळे आमचे कुटुंब अस्वस्थ आहे,” असे झिशान सिद्दिकी यांनी एएनआयला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यावर सांगितले.
हे ही वाचा:
जगात अस्तित्वात नसलेले दोन फोन नंबर हाच गुन्ह्याचा पुरावा…
Harihareshwar मनःशांतीचा किनारा
राहुल गांधींच्या नागरिकत्वाबाबत १० दिवसांत उत्तर द्या!
परकोट्यातील शिव मंदिराच्या शिखरावर कलशाची स्थापना
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची मुंबईतील खेरवाडी येथील त्यांच्या कार्यालयासमोरच १२ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री मारेकऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार करत हत्या केली होती. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. आता बाबा सिद्दिकींचा मुलगा झिशान सिद्दिकींना तुझ्या वडिलांप्रमाणेच हत्या केली जाईल अशी धमकी देण्यात आली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली होती.