राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची हत्या एसआरएच्या वादातूनच ?

आमदार झिशान सिद्दीकीच्या ट्विटने खळबळ

राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची हत्या एसआरएच्या वादातूनच ?

राज्यमंत्री बाबा सिद्दीकीच्या हत्येचे कारण आमदार झिशान सिद्दीकी ट्विट वरून समोर येत आहे, “माझ्या वडिलांनी गरीब निष्पाप लोकांचे घर वाचवताना जीव गमावला,असे झिशान सिद्दीकीने ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे.

झिशानचा ट्विटचा अर्थ नेमका काय आहे? या ट्विट वरून एसआरए प्रकल्पातून हे हत्याकांड घडवून आणले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर आमदार असलेले झिशान सिद्दीकीने असे पहिल्यांदा ट्विट केले आहे.

राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येला ६ दिवस उलटत आले परंतु अद्याप त्यांच्या हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या गुन्ह्याचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे देण्यात आलेला असून गुन्हे शाखेने या हत्या प्रकरणात दोन हल्लेखोरासह चार जणांना अटक केली आहे. सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडणारा मुख्य हल्लेखोर शिवकुमार गौतम हा अद्याप सापडलेला नाही. या हत्याकांडाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेकडून सलमान खान हल्ला प्रकरण, राजकीय वाद तसेच एसआरए वाद या तिन्ही बाजू तपासण्यात येत आहे.

परंतु अद्याप या हत्याकांडाचा मुख्य हेतू समोर आलेला नाही, दरम्यान बाबा सिद्दीकी यांचे आमदार पुत्र झिशान सिद्दीकी यांनी बुधवारी आणि गुरुवारी मुंबई पोलीस आयुक्त आणि गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त यांची भेट घेतली. सहपोलिस आयुक्त यांनी झिशान सिद्दीकी कडे या हत्याकांडाबाबत तुम्हाला कोणावर संशय आहे का? इत्यादी प्रश्न विचारण्यात आले, परंतु झिशान यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात काय सांगितले हे पोलिसकडून उघड करण्यात आले नाही.

आमदार झिशान सिद्दीकी यांनी गुरुवारी दुपारी मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची भेट घेतल्यानंतर तासाभराने त्यांच्या ट्विटर हँडल वर एक ट्विट करण्यात आले, “माझ्या वडिलांनी गरीब निष्पाप लोकांचे जीवन आणि घरांचे संरक्षण आणि संरक्षण करताना आपला जीव गमावला. आज माझे कुटुंब तुटले आहे, परंतु त्यांच्या मृत्यूचे राजकारण केले जाऊ नये आणि त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये.मला न्याय हवा आहे, माझ्या कुटुंबाला न्याय हवा आहे,! असे ट्विट झिशान सिद्दीकी यांनी केले आहे. झिशान यांच्या ट्विट मुळे बाबा सिद्दीकी यांची हत्या एसआरए प्रकल्पातून झाला असल्याचे संशय व्यक्त केला जात आहे.

हे ही वाचा:

सिद्धरामय्यांनी आता राजीनामा द्यावा

बहराइच हत्येतील आरोपी सर्फराज, तालिबला पायावर मारल्या गोळ्या

झाकीर नाईकच्या व्हिडीओंनी प्रभावित होऊन सलमानने मुथ्यालम्मा मंदिरात केली तोडफोड

झाकीर नाईक भारतातून पळालेला नमुना…पाकिस्तानी पत्रकाराने काढली लायकी

मागील सहा ते आठ महिन्यांपासून, सिद्दीकी आणि त्यांचा मुलगा काँग्रेस आमदार झीशान हे देशातील सर्वात महागड्या रिअल इस्टेट मायक्रो मार्केटपैकी एक असलेल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील संत ज्ञानेश्वर नगर आणि भारत नगर या दोन झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांना विरोध करत होते. या ठिकाणी त्यांनी आंदोलन देखील केले होते, तसेच येत्या काळात वांद्रे पूर्व येथे मोठे आंदोलन देखील करण्यात येणार होते.

संत ज्ञानेश्वर नगरच्या पुनर्विकास करणाऱ्या कंपनीत 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यातील शहिद बलवा यांनी मोठी गुंतवणूक केली होती, त्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट् आहे. सिद्दीकी पितापुत्राच्या या आंदोलनामुळे त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट रखडत चालला होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

ऑगस्ट महिन्यात झिशानने सरकारी अधिकाऱ्यांना झोपडपट्टी वसाहतीचे सर्वेक्षण करण्यापासून रोखले आणि अधिकाऱ्यांना त्यांचे कर्तव्य बजावण्यात अडथळा आणला होता. याप्रकरणी खेरवाडी पोलीस ठाण्यात आमदार झिशान सिद्दीकीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Exit mobile version