29 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरक्राईमनामायुवराज सिंगला का झाली अटक?

युवराज सिंगला का झाली अटक?

Google News Follow

Related

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगला हरियाणातील हिसार येथे अटक करण्यात आली. अटकेनंतर त्याला जामीन मिळाला आहे. युवराजवर जातीवाचक वक्तव्य केल्याचा आरोप होता. या प्रकरणाची तक्रार गेल्या वर्षी करण्यात आली होती. यानंतर एससी- एसटी कायद्याच्या अंतर्गत त्याच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला. रविवारी (१७ ऑक्टोबर) त्याला या प्रकरणात अटक करण्यात आली. मात्र, त्याला लगेच जामीनही मिळाला. पण तक्रारदार वकील आणि सामाजिक कार्यकर्ते रजत कलसन यांनी पोलिसांच्या या कारवाईबद्दल असमाधान व्यक्त केले आहे.

२०२० मध्ये लॉकडाऊनदरम्यान इतर अनेक खेळाडूंप्रमाणे युवराज सिंगदेखील आपल्या सहकारी खेळाडूंसह इंस्टाग्राम लाईव्हवर बोलत होता आणि त्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करत होता. त्याने भारतीय संघाचा फलंदाज रोहित शर्मासोबत असेच एक लाईव्ह चॅट केले होते. या लाईव्हदरम्यान युवराजने भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलबद्दल एक जातीवादी शब्द वापरला होता.

युवराजच्या या वक्तव्यानंतर बराच वाद झाला होता आणि समाज माध्यमांवर त्याच्या विरोधात मोहीमही सुरू झाली होती. दरम्यान हिसार जिल्ह्यातील हांसी येथील वकील रजत कलसन यांनी माजी भारतीय क्रिकेटपटूविरोधात तक्रार दाखल केली होती, त्यानंतर एससी- एसटी कायद्याच्या कलमांखाली युवराजविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला होता. हे वकील गेल्या वर्षापासून युवराजच्या अटकेची मागणी करत होते.

हे ही वाचा:

‘टोपे साहेब, आता विद्यार्थ्यांसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था कराच’

राज ठाकरेंच्या नावे खंडणी मागणारे पोलिसांच्या ताब्यात!

ठाण्यात ‘ढाण्या वाघा’चे पोस्टर्स; शिवसेनेला आव्हान दिल्याची चर्चा

उद्धव ठाकरे बकरा, शरद पवार कसाई! सदाभाऊंचा सणसणीत टोला

२०१९ मध्ये या प्रकरणात युवराजने अटक टाळण्यासाठी पंजाब- हरियाणा उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. सन २००० मध्ये भारतीय संघात पदार्पण करणाऱ्या युवराज सिंगने २०१७ मध्ये भारतासाठी शेवटचा सामना खेळला आणि २०१९ मध्ये त्याने निवृत्ती जाहीर केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
218,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा