बिल्डर युसूफ लकडावाला याला ईडीने केली अटक 

बिल्डर युसूफ लकडावाला याला ईडीने केली अटक 

बांधकाम व्यवसायिक तसेच चित्रपट फायनान्सर युसूफ लकडावाला याला मनी लॉन्ड्रींग प्रकरणात शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालय  (ईडी) ने अटक केली आहे. गुरुवारी युसूफ लाकडावाला याला ईडीने चौकशीसाठी कार्यालयात बोलावून घेतले होते, चौकशीनंतर शुक्रवारी त्याला मनी लॉन्डरिंगच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

हैदराबादच्या नवाबाची खंडाळा येथील ५० कोटी किमतीची जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे कमी किमतीत बळकावल्याचा आरोप लकडावाला यांच्यावर आहे. या प्रकरणात युसूफ लकडावाला यांच्याकडे ईडीकडून चौकशी सुरू होती. याप्रकरणी २०१९ मध्ये मुंबई आर्थिक गुन्हे शाखेत युसूफ लकडावाला याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. युसूफ लकडावाला याला एप्रिल २०१९ मध्ये अहमदाबाद येथून मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने अटक देखील केली होती.

हे ही वाचा:

समाजमाध्यम कंपन्यांनी आधी नियम पाळा, मग न्यायालयात जा!

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सिद्धार्थ पिठाणीला अटक

महिना लोटला, पालिकेच्या स्वप्नातील ऑक्सिजन प्रकल्प गेले कुठे?

‘वाझेच्या माहितीत असं काय काळंबेरं आहे जे हे वसुली सरकार लपवू इच्छिते?’

हैदराबाद येथील नवाबाच्या मालकीची साडेचार एकर जमीन बळकावण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करण्यात आले होते. मुंबई निबंधक कार्यालयात नोंदणी झाल्याचे खोटे दाखवण्यात आले. तसेच मावळ दुय्यम निबंधक कार्यालयातील खरी कागदपत्रे गहाळ करण्याचा प्रयत्नही झाला होता. याप्रकरणात युसूफ लकडावाला याच्यासह चार जणांना करण्यात  आली होती. या गुन्ह्या प्रकरणी ईडीने आपल्याकडे नोंदवून तपास सुरु केला होता. जामिनावर बाहेर असलेल्या युसूफ लाकडावाला यांच्याकडे ईडीकडून चौकशी सुरु होती. गुरुवारी युसुफ लकडावाला याला ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीअंती शुक्रवारी युसूफ लाकडावाला याला ईडीने अटक केली आहे.

Exit mobile version