23 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामाऑनलाइन फ्रॉड करण्यासाठी मुंबईतून तरुणांना नेण्यात आले परदेशात

ऑनलाइन फ्रॉड करण्यासाठी मुंबईतून तरुणांना नेण्यात आले परदेशात

आपण जाळ्यात अडकल्याचे लक्षात आल्यानंतर केला फोन

Google News Follow

Related

एका बड्या आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरीचे आमिष दाखवून त्यांना थायलंड मार्गे छुप्या मार्गाने म्यानमार येथे आणून त्यांच्या कडून बळजबरीने ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे करून घेतले जात असल्याचा धक्का दायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल झालेला आहे, या रॅकेटमध्ये सामील असणाऱ्याचा कसून शोध घेण्यात येत आहे.

मुंबईतील वांद्रे परिसरात राहणारे शाबाज खान, याकुब सय्यद व साकीब अली सय्यद हे तिघे या रॅकेटचे बळी पडले आहेत. इमॅन्युअल नावाची व्यक्ती मुंबईतून शिक्षित तरुणांना थायलंड येथे एका बड्या आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना थायलंड येथे पाठवत आहे.

हे ही वाचा:

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दाऊद कनेक्शनचे आणखी किती पुरावे हवेत?

ब्रह्मास्त्रावर बहिष्कारास्त्र चालणार?

म्हणून श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन तासनतास लांबले

डोवाल याच कारणाने मुंबईत आले होते का ?

 

थायलंड येथे गेल्यानंतर या तरुणांना एका हॉटेलमध्ये थांबवले जात असे.तेथून त्यांना ९ ते १० तासाच्या प्रवासानंतर एका बंकरमध्ये शस्त्रधारी इसमाच्या देखरेखीत ठेवले जाई.  त्यांच्याजवळून पासपोर्ट आणि व्हिसा ताब्यात घेऊन त्यांना बेकायदेशीर सीमा ओलांडून म्यानमार येथे आणले जात असे.

त्या ठिकाणी त्यांना सोशल मीडियावर आपले सावज शोधायचे, त्यांना क्रिप्टो करन्सीचा मेसेज टाकायचा आणि त्यांना जायरो इंटरनॅशनल आय. जी. टी कंपनीची’ क्रिप्टो करन्सी विकण्याचे काम देण्यात येत असे. सहा महिन्यात सहा हजार डॉलर क्रिप्टो करन्सी विकल्यानंतर त्यांना पासपोर्ट व्हिसा देऊन त्यांची सुटका करण्यात येईल, अशी धमकी त्यांना देण्यात आली होती.

हा सर्व प्रकार म्यानमार येथे गेलेल्या तरुणांपैकी एकाने आपल्या एका मित्राला इंटरनेट कॉल करून सांगितला व आमची येथून सुटका करा, अशी विनंती या तरुणांनी केली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकणाचा तपास उच्च पातळीवर सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा