जोगेश्वरी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यु

जोगेश्वरी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यु

जोगेश्वरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या २८ वर्षीय तरुणाचा पोलीस ठाण्यात मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी समोर आली आहे. या तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात पाठविण्यात आला असून मुलाच्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी अशी मागणी कुटूंबियांनी केली आहे.

याप्रकरणी जोगेश्वरी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद केली असून या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे.
दीपक जाधव (२८) असे मृत तरुणाचे नाव आहे. दीपक हा कुटूंबियासह जोगेश्वरी पूर्व येथे राहण्यास होता.दीपक हा कॅटरिंग सर्व्हिस मध्ये वेटर पुरवठा करण्याचे काम करीत होता.बुधवारी एका समारंभात कॅटरिंग सर्व्हिससाठी दीपकने वेटर पुरवले होते, दरम्यान दीपक आणि वेटर कामासाठी पुरवलेल्या मुलांमध्ये पैसांवरून वाद झाला होता. त्यातून झालेल्या भांडणाची तक्रार देण्यासाठी दीपक पहाटे जोगेश्वरी पोलीस ठाण्यात गेला होता.

त्यावेळी अचानक तो जमीनीवर कोसळला, पोलिसांनी त्याला तात्काळ ट्रॉमा रुगणालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

पोलीस ठाण्याच्या आता घडलेल्या घटनेमुळे जाधव यांच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की त्यांचा मृत्यू ठाणे अंमलदार कक्षात पोलिसांच्या उपस्थित झाला. त्याच्या सोबत पोलिस अधिकाऱ्यांनी गैरवर्तणूक केल्यामुळे त्यांचे अकाली निधन झाले.

जोगेश्वरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव पोलीस ठाण्यातील स्वच्छतागृहातून बाहेर पडल्यानंतर खाली कोसळला. त्याला तात्काळ जोगेश्वरी (पूर्व) येथील ट्रॉमा केअर युनिटमध्ये नेण्यात आले, तेथे पहाटे 4:44 वाजता त्याला मृत घोषित करण्यात आले.

डीसीपी (झोन X) मंगेश शिंदे यांनी जाधव यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांचे खंडन करताना सांगितले की, “जाधव यांचे त्यांच्या कर्मचाऱ्यांशी थकीत वेतनावरून भांडण झाले. नंतर त्यांनी तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात भेट दिली. मात्र, तो बाहेर पडल्यानंतर खाली कोसळला. त्याला पोलिसांनी तातडीने रुग्णालयात नेले.

हे ही वाचा:

७०० कर्मचाऱ्यांची विविध पथके, असंख्य सीसीटीव्हीचा तपास, ड्रोनचा वापर, एक आरोपी गजाआड!

जम्मू काश्मीर निवडणूक तर झाली, पण पाकिस्तानी घुसखोरी भाजपासाठी त्रासदायक!

संतापजनक! दुर्गामातेच्या मूर्तीचे हात ग्राइंडिंग मशिनने तोडले!

नवी मुंबई विमानतळावर ‘सी-२९५’ आणि सुखोईचे यशस्वी लँडिग!

जोगेश्वरी पोलिस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने पुष्टी केली की ट्रॉमा केअर युनिटमध्ये नायब तहसीलदारांच्या उपस्थितीत कॅमेऱ्यासमोर मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला आहे. जाधव यांच्या शरीरावर कोणत्याही बाह्य जखमा आढळल्या नाहीत. “मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी मृतदेह जेजे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. जरी हा अपघाती मृत्यू आहे. कस्टोडिअल डेथनुसार प्रक्रिया करून तहसीलदारांना कळवण्यात आले आणि कॅमेऱ्यासमोर चौकशी करण्यात आली,” अधिकारी म्हणाले. अधिकाऱ्याने पुढे स्पष्ट केले की चौकशी म्हणजे मृत्यूच्या आजूबाजूच्या परिस्थितीची चौकशी, ज्याचा उद्देश मृत व्यक्तीची ओळख पटवणे आणि त्यांचा मृत्यू कसा, केव्हा आणि कुठे झाला हे ठरवणे होय.

चौकशी दरम्यान गोळा केलेली माहिती मृत्यूची नोंद करण्यासाठी वापरली जाते आणि ती चाचणी नाही. जाधव यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांसह या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी हे प्रकरण आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येणार आहे.

Exit mobile version