उदयपूरनंतर आता बिहारमध्ये नुपूरप्रकरणी एका तरुणाला भोसकले

उदयपूरनंतर आता बिहारमध्ये नुपूरप्रकरणी एका तरुणाला भोसकले

राजस्थानात उदयपूर येथे भाजपाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याच्या निमित्ताने एकाची गळा चिरून हत्या करण्यात आल्यानंतर आता बिहारच्या सीतामढीत नुपूर शर्मा यांचा व्हीडिओ पाहिल्याबद्दल एकावर चाकूहल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. हा युवक गंभीर जखमी असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही घटना १६ जुलैला घडली होती पण मंगळवारी ही घटना समोर आली आहे. सितामढी जिल्ह्यातील नानपूर येथे ही घटना घडली. जखमी झालेला युवक अंकित झा हा नानपूर गावात पान खाण्यासाठी दुकानात गेला. तिथे तो आपल्या फोनमधील नुपूर शर्मा यांचे स्टेटस बघत होता. तेव्हा काही युवक मागून आले आमि त्याला विचारू लागले की, तो काय बघतोय? तेव्हा त्याने नुपूर शर्मा यांचे भाषण स्टेटस म्हणून लावल्याचे सांगितले. तेव्हा त्यांच्यात हाणामारी झाली. त्यानंतर या युवकावर चार-पाच वेळा चाकुने वार करण्यात आले. अंकित या युवकाने सांगितले की, ते तीन-चार लोक होते. एका युवकाने आपल्या तोंडावर सिगारेटचा धूर सोडला. त्यानंतर वाद वाढला तेव्हा त्यांनी चाकूने वार केले. त्यातील पल्सर गाडीवरून आलेल्या युवकाला पोलिसांनी पकडले. पण तेवढ्यात २५-३० मुस्लिम लोक तिथे आले आणि त्या युवकाला सोडवून घेऊन गेले.

अंकितच्या वडिलांनी यासंदर्भात सांगितले की, त्यांनी पोलिस ठाण्यात प्राथमिक तक्रार दिली आहे. त्यात नानपूरच्या गोडा उर्फ गुलाब रब्बानी, मोहम्मद निहाल, मोहम्मद हेलाल, मोहम्मद बेलाल अशा पाच जणांची नावे आहेत. या तक्रारीत नुपूर शर्मा यांचे नाव येता कामा नये, असे सांगून ती तक्रार नोंदविण्यात आली, असेही अंकितच्या वडिलांनी सांगितले.

हे ही वाचा:

…पण उद्धव म्हणाले, राष्ट्रवादीची साथ सोडणार नाही!

लहानगीने मुख्यमंत्र्यांना विचारलं, सुट्टीत गुवाहाटीला फिरायला घेऊन जाणार का?

“शरद पवारांनी वेळ साधून शिवसेना फोडली”

स्विमिंग पूलमध्ये पडून लहानग्याचा मृत्यू

 

यासंदर्भात डीएसपी विनोद कुमार यांच्या नेतृत्वाखी छापेमारी करत गुलाब रब्बानी, मोहम्मद निहाल यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी मात्र म्हटले की, नुपूर शर्मा प्रकरणाचा याच्याशी संबंध नाही. काही लोक एकत्र आले होते, त्यातून हे कृत्य घडले.

Exit mobile version