26 C
Mumbai
Sunday, October 20, 2024
घरक्राईमनामामुख्यमंत्र्यांना धमकी देणारा सापडला पुण्यात, पोलिसांनी घेतले ताब्यात

मुख्यमंत्र्यांना धमकी देणारा सापडला पुण्यात, पोलिसांनी घेतले ताब्यात

पोलिसांनी लागलीच कारवाई केल्यानंतर त्याचा ठावठिकाणा पुण्यात असल्याचे झाले निष्पन्न

Google News Follow

Related

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी पुण्यातील वारजे येथून अटक केलीय. सदर आरोपीने दारूच्या नशेत सोमवारी १० एप्रिल रोजी रात्री पोलिसांना ११२ या क्रमांकावर कॉल करून मुख्यमंत्र्यांना मारण्याची धमकी दिली होती.

यासंदर्भातील माहितीनुसार पोलिसांना सोमवारी रात्री ११२ क्रमांकावरवर फोन आला ज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. “मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे” असे बोलून कॉलरने कॉल कट केला. डायल ११२ चे कंट्रोल रुम नागपूरमध्ये आहे, तिथेच हा कॉल आला होता. या कॉलनंतर पोलीस सतर्क झाले.

फोन कुठून आला होता, त्याचा ठावठिकाणआ काय याची माहिती पोलिसांनी तपास करून घेतली. पोलिसांना मिळालेल्या लोकेशननुसार फोन पुण्यातील वारजे इथून आला होता. त्यानंतर पोलीस या ठिकाणी पोहोचले आणि एका व्यक्तीला ताब्यात घेतले.

परंतु, पोलिसांना या इसमाला ताब्यात घेतले तेव्हा तो दारुच्या नशेत होता. पहिल्यांदा त्याने ऍम्ब्युलन्ससाठी कॉल होता. परंतु, ऍम्ब्युलन्स आली नाही म्हणून त्याने डायल ११२ कॉल करुन थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवून टाकण्याची धमकी दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी नशेखोर असून त्याने नशेच्या अंमलाखाली मुख्यमंत्र्यांना धमकी दिली.

हे ही वाचा:

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही ! हवालदिल बळीराजाला मुख्यमंत्र्यांचा दिलासा

मोबाईल फोन काढून घेतला म्हणून केली आत्महत्या

एकेकाळी सिलिंडर उचलणाऱ्या रिंकूने आयपीएलमध्ये शिवधनुष्य उचलले

मविआचे काय होणार? रोहित पवारांची ‘ब्लॅक कॉफी पे चर्चा…’

गेल्या काही महिन्यांत अशाप्रकारच्या अनेक धमक्या राजकीय नेत्यांना आल्याचे समोर आले होते. त्या धमकी देणाऱ्यांचा मागही काढण्यात आला होता. खासदार संजय राऊत यांनाही पुण्यातील एकाने नशेतच धमकी दिल्याचे समोर आले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
183,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा