नको त्या अवस्थेतील व्हीडिओ व्हायरल न करण्यासाठी मागितले ५ लाख

पोलिसांनी केली अटक

नको त्या अवस्थेतील व्हीडिओ व्हायरल न करण्यासाठी मागितले ५ लाख

मित्राचा मैत्रिणी सोबत विवस्त्र अवस्थेत व्हिडीओ बनवून व्हायरल न करण्याच्या बदल्यात ५ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आल्याची घटना जोगेश्वरी ओशिवरा या परिसरात घडली. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने याप्रकरणी एकाला अटक केली असून दुसऱ्या मित्राचा शोध घेण्यात येत आहे.

अरबाज हनिफ उकानी उर्फ मॅडी याला अटक केली असून त्याच्याजवळून मोबाईल फोन जप्त करण्यात आलेला आहे. ओशिवरा परिसरात राहणारा २० वर्षांचा महाविद्यालयीन तरुण हा एका मैत्रिणीसोबत एका हॉटेलच्या खोलीत असतांना त्याचा मित्र जैद उर्फ अब्बास याने हॉटेलच्या खोलीत मोबाईल फोन चार्ज करण्याच्या निमित्ताने एका विशिष्ठ प्रकारचे अँप डाउनलोड करून मोबाईलचा कॅमेरा सुरू ठेवून निघून गेला होता.

हे ही वाचा:

आशीष शेलार यांच्या सुरक्षा रक्षकाशी महिलेने केले गैरवर्तन; गुन्हा दाखल

बुलेट ट्रेनचे काम सुस्साट! अखेरचा १३५ किमीचा टप्पा शिल्लक

धर्मांतरणाचा तगादा लावणाऱ्या तरुणाने फेकले तरुणीला चौथ्या मजल्यावरून खाली

आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी-शी जिनपिंग एकमेकांना भेटले, झाला संवाद

 

त्याच्या मोबाईल फोनमध्ये पीडित तरुण व त्याची मैत्रीण या दोघांचे विवस्त्र अवस्थेतील चित्रण कैद झाले होते.हा व्हिडीओ जैद याने मदुसरा मित्र अरबाज उकानी उर्फ मॅडी याला शेअर केला. मॅडीने पीडित तरुणाला हा व्हिडीओ दाखवून त्याच्याकडे ५ लाख रुपयांची मागणी केली, अन्यथा हा व्हिडीओ व्हायरल करू अशी धमकी दिली. घाबरलेल्या पीडित तरुणाने त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला व व्हिडीओ डिलीट करण्याची विनंती करून देखील मॅडीने त्याचे न ऐकता ५ लाख रुपये दिले तरच व्हिडीओ डिलीट करील असे त्याने सांगितले. अखेर या तरुणाने गुन्हे शाखा व त्यानंतर ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. खंडणी विरोधी पथकाने या गुन्ह्याचा तपास करून अरबाज उर्फ मॅडी याला अटक करून त्याच्या जवळील मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.

Exit mobile version