धावत्या लोकलमध्ये स्टंटबाजी करणारा तरुण खाली कोसळला

धावत्या लोकलमध्ये स्टंटबाजी करणारा तरुण खाली कोसळला

मुंबईकरांच्या जीवनात लोकलला खूप महत्व आहे. मात्र अनेक लोक लोकल प्रवास करताना अनेक स्टंट करतात. अनेक वेळा हे स्टंट तरुणांच्या जीवावर बेततात. अशीच घटना गुरुवार, २३ जून रोजी मध्य रेल्वेमध्ये घडली आहे. धावत्या लोकलच्या बंद बॅटरी रूमच्या दरवाजाच्या कमी जागेत लटकून स्टंटबाजी तरुणाच्या अंगाशी आले आहे. सुदैवाने या तरुणाचा जीव वाचला आहे.

दानिश जकिर हुसैन खान असं या तरुणाचं नाव असून त्याचे वय १८ वर्ष आहे. कळवा परिसरात राहणारा हा दानिश काल सकाळी चिंचपोकळीला जात होता. कळवा ते दादर या लोकलने जात असताना सकाळच्या वेळेस या लोकलला गर्दी होती. म्हणून हा दानिश आणि इतर तीन तरुण बंद बॅटरी रूमच्या दरवाजाला लटकून प्रवास करत होते. प्रवास करताना दानिशचा पाय सटकला आणि तो खाली पडला. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ एका इसमाने त्याच्या फोनमध्ये शूट केला आहे. तो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे.

हे ही वाचा:

सोनं घ्या, सोन्यासारखे रहा!

भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्याम सप्रे यांचे निधन

महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर आसामच्या मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

… तर मविआतून बाहेर पडू- राऊत

अपघातानंतर दानिशला त्याच्या आते भावाने आणि एका इसमाने कालवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या अपघातात त्याचा पाय आणि हात फ्रॅक्चर झाला आहे. सध्या दानिश शुद्धीवर आला आहे. झालेला अपघात हा स्वतच्या निष्काळजीपणामुळे झाले असलेबाबत जखमी इसमाने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. तसेच जखमी दानिश ठाणे रेल्वे पोलीस ठाणे येथे ईपीआर नोंद असून पुढील अधिक तपास ठाणे रेल्वे पोलीस करीत आहेत.

Exit mobile version