नवी मुंबईत ‘छावा’ चित्रपटात मस्करी करणाऱ्यांना प्रेक्षकांनी गुडघ्यांवर बसवले!

छत्रपती संभाजी महाराज की जयच्या घोषणा देण्यास सांगितले

नवी मुंबईत ‘छावा’ चित्रपटात मस्करी करणाऱ्यांना प्रेक्षकांनी गुडघ्यांवर बसवले!

सध्या छावा या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. मात्र यानिमित्ताने अनेक वादविवादही होत आहेत. नवी मुंबईत अशाच एका वादानंतर चित्रपटगृहातील प्रेक्षकांनी काही वात्रट प्रेक्षकांना चांगलाच धडा शिकवला.

कोपर खैरणे भागातील बालाजी मूव्हीप्लेक्स थिएटरमध्ये छावा या चित्रपटाचा शो सुरू होता. मात्र त्यातील छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येच्या प्रसंगादरम्यान काही तरुण हसत होते, थट्टामस्करी करत होते. त्यावरून तेथील प्रेक्षकांमध्ये संताप उसळला.

चित्रपट संपल्यावर या सगळ्या तरुणांना प्रेक्षकांनी धडा शिकवला. चित्रपटाच्या क्लायमॅक्स दरम्यान हसणे आणि विनोद करणे यासाठी पाच पुरुषांना माफी मागण्यास भाग पाडले गेले. तसा व्हीडिओ आता व्हायरल झाला आहे. या सगळ्या तरुणांना ढोपरावर बसून डोके जमिनीवर टेकायला लावले तसेच त्यांना छत्रपती संभाजी महाराज की जय अशी घोषणा देण्यास सांगण्यात आले.

हे ही वाचा:

लोककला आणि नाटक याबाबत अधिक संशोधन करा

झारखंडला इस्लामिक राज्य घोषित करण्याची वेळ आलीये!

धक्कादायक! केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड!

हरियाणात महिला काँग्रेस कार्यकर्त्याचा सुटकेसमध्ये आढळला मृतदेह!

या पुरुषांना गुडघे टेकून माफी मागण्यास सांगण्यात आली. त्यापैकी एकाने मराठीत छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली, “मी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागतो” असे तो म्हणाला. परंतु गर्दीने त्याला सुनावले की, छत्रपती संभाजी महाराजांची माफी माग. त्यानंतर त्या माणसाने हिंदीमध्ये माफी मागितली तो म्हणाला की, “छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपट सुरू असताना आम्ही त्यावर हसत होतो. तो माणूस पुढे म्हणाला, ही जागा (मुंबई) आमची कर्मभूमी आहे, आपण कसे विसरू शकतो.

Exit mobile version