28 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरक्राईमनामाईदच्या जुलूसमधील टवाळखोरांकडून महिला पोलीस कॉन्स्टेबलची छेड, विक्रोळीत तणाव

ईदच्या जुलूसमधील टवाळखोरांकडून महिला पोलीस कॉन्स्टेबलची छेड, विक्रोळीत तणाव

हिंदू संघटनांची आरोपीना तात्काळ अटक करण्याची मागणी

Google News Follow

Related

ईद-ए -मिलादच्या जुलूसमधील एका मुलाने रस्त्यावरून जाणाऱ्या साध्या वेशातील महिला कॉन्स्टेबलची छेड काढली. या महिलेने या तरुणाला पकडले असता जुलूसमधील काही तरुणांनी त्याला पळवून लावल्याची घटना शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पूर्व उपनगरातील विक्रोळी पश्चिम येथे घडली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच परिसरात तणाव निर्माण झाला.

या घटनेप्रकरणी पार्क साईड पोलिसांनी तात्काळ विनयभंगाचा गुन्हा दाखल करून कायदा व सुव्यवस्था बिघडू मनये म्हणून परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. दरम्यान या घटनेचा ईदच्या जुलूसचा काही संबंध नसल्याचा खुलासा पार्क साईड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक मेर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे.

 

या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले असून ताब्यात घेण्यात आलेला मुलगा हा अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पीडित महिला कॉन्स्टेबल ही मुंबई पोलीस दलाच्या सशस्त्र विभागात कार्यरत आहे. शुक्रवारी सुट्टी असल्यामुळे ती विक्रोळी सूर्य नगर येथे नातलगाकडे आली होती. रात्रीचे जेवण हॉटेलमध्ये करण्यासाठी कॉन्स्टेबल नात्यातील महिलेसोबत निघाली होती.

एलबीएस मार्गावर असलेल्या सिप्ला कंपनी येथून जात असताना या महिला कॉन्स्टेबलची काही तरुणांनी छेड काढली, त्यावेळी या कॉन्स्टेबल महिलेने या तरुणाला पकडले. त्यावेळी मोटार सायकलला झेंडे लावून जुलूस साठी निघालेले तरुण त्या ठिकाणी आले व छेड काढणाऱ्या मुलाला त्यांनी पळून जाण्यास मदत केली व स्वतः ही तेथून निघून गेले या घटनेचा व्हिडीओ काही जणांनी आपल्या मोबाईल मध्ये काढला व हा व्हिडीओ परिसरात व्हायरल करण्यात आला.

व्हिडीओ व्हायरल होताच परिसरात तणाव निर्माण झाला. या घटनेची माहिती मिळताच पार्क साईड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पीडित महिला कॉन्स्टेबलला पोलिस ठाण्यात आणून तिची तक्रार नोंदवून घेण्यात आली. याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसानी दिली. दरम्यान सूर्य नगर परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

या महिला कॉन्स्टेबलची छेड काढतानाचा व्हिडीओ परिसरात व्हायरल होताच परिसरा तील वातावरण तापले आणि शनिवारी काही हिंदू संघटनांनी पोलीस ठाण्याकडे धाव घेऊन आरोपीना अटक करण्याची मागणी करत पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.

हे ही वाचा:

अमेरिकेमध्ये १ ऑक्टोबरपासून शटडाऊनचे संकट

२५ कोटींच्या लुटीचा कट दिल्लीच्या ठगाने एकट्याने नेला तडीस

विसर्जन सोहळ्यादरम्यान हरवलेल्या २२ मुलांना पालकांकडे सोपवले!

आशियाई स्पर्धेत टेनिसमध्ये भारताला सुवर्ण

दरम्यान, भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी पार्क साईड पोलीस ठाण्यात धाव घेतली.कोटक यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.

परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असून महिलेची छेड काढणारा आणि त्याला पळवून लावणारे दोघेजण विधिसंघर्ष बालक असून त्यांना बाल न्यायालयात हजर करण्यात येणार असून एकाला अटक करण्यात आली आहे, कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस उपायुक्त कराड यांनी केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा