स्वतःच स्वतःवर गोळीबार करून हल्ला झाल्याचा बनाव रचणाऱ्या व्यक्तीवरच त्याचा डाव उलटला आहे. शिवसेनेचा उपशाखाप्रमुख व बॅनर व्यावसायिक राजेश घुडे उर्फ बाळा याने स्वतःवरच गोळीबार करून जीवघेणा हल्ला झाल्याचा डाव रचला होता. याप्रकरणी पालघर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पालघर न्यायालयाने त्याला १० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
फिर्यादी घुडे याने पोलिसांत अशी तक्रार केली होती की, तो सोनोपंत दांडेकर-खारेकुरण रस्त्यावरून जात असताना त्याच्यावर काही अज्ञातांनी गोळीबार करून जीवघेणा हल्ला केला.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करायला सुरुवात केली होती परंतु , तपासातून काहीच निष्पन्न होत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी तपास अधिक गतीने करायला सुरवात केली असता पुरावे घुडे विरोधात मिळाले. तेव्हा त्याने स्वतःवरच गोळीबाराचा कट रचल्याचे उघड झाले.
हे ही वाचा:
हिमाचल प्रदेश ठरले १०० टक्के लसीकरण करणारे पहिले राज्य
उद्योग जगतातील आसामी रतन टाटांना ‘आसाम वैभव’
राज्यातील निवासी डॉक्टर ‘या’ मागणीसाठी संपावर
‘मिलिंद नार्वेकर म्हणजे आत्ताचे नवे शिवसेनाप्रमुख का?’
पालघर पोलिसांनी त्याला शनिवारी रात्री ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्यानेच स्वतः हा कट रचल्याचे पुरावे पोलिसांना मिळाल्याचे पोलीस उपाअधीक्षिका यांनी सांगितले. आरोपी म्हणून पोलिसांनी त्याला रविवारी न्यायालयात हजर केले व न्यायालयाने त्याला १० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जीवाला धोका असल्याचे भासवून नंतर बंदुकीचा परवाना मिळू शकतो, यासाठी आरोपीने हा कट रचल्याची चर्चा पालघरमध्ये सुरू आहे.