31 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरक्राईमनामावंदे मातरम घोषणा देत तरुणाची इमारतीवरून उडी मारत आत्महत्या

वंदे मातरम घोषणा देत तरुणाची इमारतीवरून उडी मारत आत्महत्या

Google News Follow

Related

चर्चगेट येथील जयंत महल या इमारतीवरून एका तरुणाला स्वतःला झोकून दिले आणि आत्महत्या केली. वंदे मातरम ची घोषणा देत या तरुणाने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेतली, त्यात तो गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.

या तरुणांची ओळख पटलेली नसून तो या इमारतीत कश्यासाठी आला होता याबाबत काही कळू शकलेले नाही. पहाटे ५ ते साडेसात वाजताच्या सुमारास ही घटना चर्चगेट येथील जयंत महल या इमारतीत घडली.

हा तरुण ड्रेनेज पाईपच्या आधारे इमारतीच्या मागून चढत असल्याचे वॉचमनच्या लक्षात आल्यानंतर त्याने पोलिसांना बोलावून घेतले होते. घटनास्थळी दाखल झालेल्या मरीन ड्राईव्ह पोलिसांनी तात्काळ अग्निशमन दलाची मदत घेऊन त्याला खाली उतरविण्याचा प्रयत्न केला. तो उडी टाकेल म्हणून त्याला वाचवण्यासाठी सुरक्षा जाळी देखील लावण्यात आली होती. त्याशिवाय, तो ज्या मजल्यावर उभा होता, तिथून पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्नही केला. पण त्याच्याजवळ ते पोहोचत असतानाच त्याने उडी घेतली. तीन तासांच्या या थरारा नंतर त्याने शेजारच्या विश्व महल इमारतीच्या आवारात वंदे मातरम म्हणत उडी घेतली. त्यात त्याचा मृत्यू झाला.

हे ही वाचा:

दीव पालिका निवडणुकीत भाजपाचा मोठा विजय

राज्याच्या विकासात केंद्राचा मोठा वाटा…म्हणून पंतप्रधान मोदींची भेट

माजी पोलिस आयुक्त संजय पांडेंच्या कार्यायातून रेड सर्व्हर जप्त

एनबीसीसीचे माजी अधिकारी डीके मित्तल यांच्या घरातून दोन कोटींहून अधिक रक्कम जप्त

मरीन ड्राईव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या तरुणाची ओळख पटविण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा