28 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरक्राईमनामापायधुनीत तलवार गँगचा धूमाकूळ, दुकानात नाचविल्या नंग्या तलवारी

पायधुनीत तलवार गँगचा धूमाकूळ, दुकानात नाचविल्या नंग्या तलवारी

पोलिसांनी केली दोन जणांना अटक

Google News Follow

Related

कोयता गॅंगने पुण्यात दहशत माजवल्याचे व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे, त्याच प्रकारे मुंबई देखील नंग्या तलवारी घेऊन हल्ले करणाऱ्या ‘तलवार गँग’च्या व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. मुंबईतील पायधुनी या मुस्लिमबहुल परिसरात तलवारी घेऊन एका टोळीने भरबाजारात धुडगूस घालून दुकांदारावर हल्ले केल्याची घटना शुक्रवारी घडली.  

या तलवार गॅंगच्या दहशतीमुळे दुकानदार सर्वसामान्यां मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी भारतीय हत्यार कायदा, दंगल माजवणे, धमकी दिल्याप्रकरणी काही जणांवर गुन्हा दाखल करून दोन जणांना माहीम परिसरातून अटक करण्यात आली आहे.  

अमीर रईस खान (२५) आणि विनायक राजू पटेल (२०) या दोघांना पायधुनी पोलिसानी माहीम परिसरातून अटक केली असून त्यांचे इतर सहकारी फरार झाले आहेत. अमीर आणि विनायक हे दोघे माहीम परिसरात राहण्यास असून डोघे तलवार गॅंगचे म्होरके असल्याची माहिती समोर येत आहे.  

रमजानचा महिना सुरू असून मुंबईतील मुस्लिमबहुल परिसरात मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी बाहेर पडत आहे. दक्षिण मुंबईतील पायधुनी येथील नाखुदा स्ट्रीट या परिसरात मोठ्या प्रमाणात मुस्लिम समुदाय खरेदीसाठी बाहेर पडत असताना शुक्रवारी रात्री या परिसरात काही तरुण हातात नंग्या तलवारी नाचवत घेऊन बाजारात घुसले व तेथील एका कापड दुकानदारावर या तरुणांनी तलवारीने हल्ला चढवला,त्यावेळी दुकानातील एका इसमाने देखील दुकानातील तलवार काढून या तरुणांना विरोध केला.

हे ही वाचा:

अमेरिका ठरला भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश

महाराष्ट्र भूषण सन्मान सोहळ्याला गालबोट, उष्माघातामुळे १० जणांचा मृत्यू

आता रेल्वे फाटक ओलांडण्याची गरज नाही; १०० उड्डाणपूल बांधले जाणार

गुडघेदुखीतून बरा होत रणदीप हुडा करतोय सावरकरांवरील चित्रपटातून पुनरागमन  

या घटनेमुळे भरबाजारात एकच पळापळ सुरू झाली, जो तो आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागले, दुकानदारांनी तलवार गॅंगच्या भीतीने दुकाने बंद केली, पायधुनी नाखुदा स्ट्रीट परिसरातील तलवार गॅंगची ही दहशत तेथील सीसीटीव्ही कॅमेरात कैद होऊन त्याचे व्हिडीओ क्लिप समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.  

तलवार गँगच्या हल्ल्यात दोन दुकानदार किरकोळ जखमी झाले असून या घटने प्रकरणी पायधुनी पोलिसांनी भादवी कलम ३२६,३२४,४५२,५०४,५०६,१४३,१४४,१४७,१४८,१४९,४२७ सह भा ह का कलम ४,२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पायधुनी पोलिसांनी या गँगचा शोध घेऊन माहीम परिसरातून दोघांना अटक केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा