अमेरिकन डॉलर स्वस्तात मिळविण्याच्या आमिषाने एका टॅक्सीचालकाच्या हातात कागदाचे तुकडे पडल्याची घटना भिवंडीत घडली आहे. चालकाची तीन लाख रुपयांची फसवणूक झाली असून याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास घेत आहेत.
सायन कोळीवाडा परिसरातील रहिवासी अशोक चौरसिया (४६) हे टॅक्सिचालक आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गेल्या महिन्यात सायन कोळीवाडा परिसरात त्याच्या टॅक्सी दुरुस्तीचे काम सुरु असताना, सलीम नावाचा तरुण तिथे आला. त्याने अशोकशी संवाद साधायला सुरवात केली असता त्याने म्हटले की, त्याच्याकडे घरी जाण्यासाठी भारतीय चलनाचे पैसे नसून त्याच्याकडे असेलला २० डॉलरची नोट त्याने दाखवली आणि त्या बदल्यात भारतीय रुपये देण्याची विनंती केली. चालकानेही विश्वास ठेवत त्याला पन्नास रुपये दिले.
चौरसिया जाळ्यात फसत आहे हे लक्षात येताच त्याने त्याच्या मावशीकडे २० चे १५०० डॉलर असल्याचे सांगितले. दहा लाख किमतीचे डॉलर चार लाखात विकत असल्याने कमी किमतीत डॉलर विकत घेऊन पुढे जास्त पैसे कमवता येतील, असे आमिष दाखवून कोणी घेणारे असल्यास संपर्क करण्यास सांगितले. त्यावर चौरासिया यानेच डॉलर घेण्याची इच्छा वर्तवली. त्यानुसार सापळा रचत, काही दिवसाने सलीम याने एका महिलेशी ओळख करून देत ती मावशी असल्याचे भासवत, तिच्याकडील पिशवतील ३-४ डॉलर काढून दाखवले. चालकानेही विश्वास ठेवत पैसे गुंतवण्याचे कबूल केले.
हे ही वाचा:
लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या तोंडाला काळे फासले
शिवमंदिर हटविल्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी
साहित्य संमेलन की अजेंडा रेटायचे व्यासपीठ?
कसली स्टँड अप कॉमेडी, हा तर अजेंडा
चौरसियाने उधारीवर ३ लाख रुपये घेऊन सलीमला दिले. पुढे, गर्दीच्या ठिकाणी चौरासियाला सलीमने भेटायला बोलवले. पिशवीतून ३/४ डॉलर दाखवत ती पिशवी चौरसियाच्या हातात देत टॅक्सित जाऊन पैसे मोजण्यास सांगितले व स्वतः मावशीला सोडून येतो असे सांगून निघून गेला. लखपती होण्याच्या स्वप्नात गुंग असलेल्या चौरसियाने जेव्हा पिशवी उघडून पाहिली तेव्हा त्यात डॉलर नसून वर्तमानपत्राचे तुकडे पाहून त्याला धक्का बसला. त्यावर त्याने सलीमशी संपर्क साधण्याचा प्रयन्त केला असता त्याचा फोन लागला नाही. आपल्याला फसवल्याचे लक्षात येताच त्याने पोलिसांत धाव घेत त्याविरोधात तक्रार केली .