28 C
Mumbai
Wednesday, November 6, 2024
घरक्राईमनामाउर्समध्ये चक्क औरंगजेबाचा फोटो घेऊन नाचले तरुण

उर्समध्ये चक्क औरंगजेबाचा फोटो घेऊन नाचले तरुण

पोलिसांनी ८ जणांविरोधात दाखल केला गुन्हा

Google News Follow

Related

महाराष्ट्रावर कब्जा मिळविण्यासाठी २७ वर्षे ठाण मांडून बसलेला मात्र नंतर महाराष्ट्राच्याच मातीत मिसळलेला औरंगजेब अजूनही अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आपण त्याचे वारसदार आहोत, अशी भूमिका अनेकजण अजूनही मांडत असतात. वाशिम येथे अशीच एक घटना घडली असून त्यासंदर्भात ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाशिम जिल्ह्यात काही लोकांनी औरंगजेबाचा फोटो घेऊन नाच केल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात पोलिसांनी कारवाई केली आहे.

एएनआयने केलेल्या ट्विटमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, मुघल शासक औरंगजेब याचा फोटो घेऊन नाचणाऱ्या युवकांचा व्हीडिओ व्हायरल झाला असून त्यासंदर्भात पोलिसांनी ८ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दादा हयात कलंदर यांच्या उर्सचे आयोजन १ जानेवारीला करण्यात आले होते. त्यावेळी औरंगजेबाचे फोटो घेऊन काही लोक नाचत होते. तो व्हीडिओ व्हायरल झाला. त्यावरून पोलिसांनी सदर कारवाई केली आहे.

हे ही वाचा:

शर्मिला ठाकरे यांची उर्फी प्रकरणावर एका वाक्यात प्रतिक्रिया

भाजप मिशन २०२४ साठी रणनीती आखणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसमध्ये २० उद्योगांशी करणार चर्चा

सणांच्या काळात प्रवासी वाहनांची विक्री सुसाट

मंगळूरपीर पोलिसांनी ही कारवाई केली असून हा व्हायरल व्हीडिओ पोलिसांनी पाहिला आणि मग कारवाईचे पाऊल उचलले. मात्र अद्याप त्यापैकी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

मुघल शासक औरंगजेबाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात बरेच वेळा राजकारण होताना दिसते. मागे एमआयएम पक्षाचे खासदार अकबरुद्दीन ओवेसी हे औरंगाबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवर चादर चढवायला गेले होते. त्यावरून बरीच टीका झाली होती. औरंगजेब हा सुफी संत होता, अशी भूमिकाही महाराष्ट्रात मांडली गेलेली आहे. आपण औरंगजेबाचे वारसदार आहोत, अशी भावनाही अनेक मुस्लिमांमध्ये अजूनही आहे. त्यातूनच अशा प्रकारचे कृत्य घडले असेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. ज्या औरंगजेबाने महाराष्ट्रावर आक्रमण केले, छत्रपती संभाजी महाराजांना कपटाने पकडून नंतर त्यांची क्रूर हत्या केली, त्याचा गौरव महाराष्ट्रात कसा काय होऊ शकतो, असा सवाल लोक उपस्थित करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा