तामिळनाडूत युवकाने सापाचाच घेतला चावा; झाली अटक

व्हीडिओ झाला व्हायरल आणि नागरिकांनी व्यक्त केली तीव्र नाराजी

तामिळनाडूत युवकाने सापाचाच घेतला चावा; झाली अटक

सापाने आपल्या हाताचा चावा घेतल्याचा राग येऊन एकाने सापालाच चावल्याची घटना तामिळनाडूत घडली. यासंदर्भात तिघांना अटक करण्यात आली आहे. मोहन नावाचा हा इसम सापाला चावला आणि त्याने त्या सापाचे डोकेच वेगळे केले. त्याच्या मित्राने हा सारा प्रसंग रेकॉर्ड केला आणि नंतर तो व्हीडिओ त्याने फेसबुकवर टाकला. तो झटपट व्हायरल झाला आणि मग त्या तिघांना अटक करण्यात आली.

मोहन, सूर्या, संतोष अशी या तिघांची नावे असून कैनूर या जिल्ह्यातील ते रहिवासी आहेत. प्राण्यांना त्रास देऊन त्यांना मारण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. शिवाय, त्यांनी प्राण्यांना मारण्याचा व्हीडिओदेखील काढल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

हे ही वाचा:

उत्तरकाशी भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली, लोकांचे घाबरून घराबाहेर पलायन

ऐरोली-मुलुंड खाडी पुलाला जोडणार , नवी मुंबईतील पाम बीच रोडच्या विस्तारीकरणाचा प्रकल्प मार्गी

सत्तेसाठी जन्माला आलो नाही. सत्ता आपल्यासाठी एक साधन

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ बनले जगातील नववे सर्वात व्यस्त विमानतळ

या व्हीडिओत मोहन हातात साप घेऊन उभा आहे. त्या सापाने आपल्या हाताचा चावा घेतल्याचे तो सांगत आहे. त्यानंतर आपण याचा बदला घेऊ असेही तो बोलत आहे. हे मित्र त्याला सापाला सोडून देण्यास सांगत आहेत पण त्याने त्यास नकार दिला आणि त्याने चावा घेऊन त्या सापाचे डोके वेगळे केले.

१० सेकंदांच्या या व्हीडिओत हा प्रसंग रेकॉर्ड केल्याचे दिसते. त्या सापाचे डोकेही वळवळत पडल्याचे दिसते. काही सेकंद ते डोके हलताना दिसते. सोशल मीडियावर या व्हीडिओला लोकांनी  बघितले. त्यातून मोहन या तरुणाचा जोरदार निषेध सगळ्यांनी करायला सुरुवात केली. प्राणी हक्क संघटना आणि नागरिकांनी या घटनेविरोधात तक्रारी केल्या. या तिघांवर कठोर कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी करण्यास सुरुवात केली.

Exit mobile version