26 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरक्राईमनामासलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर गँगस्टर बिष्णोईच्या नावाने ओला कॅब पाठवणाऱ्याला अटक

सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर गँगस्टर बिष्णोईच्या नावाने ओला कॅब पाठवणाऱ्याला अटक

उत्तर प्रदेशातून केली होती कार बुक

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथून गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने मुंबईत ओला कॅब बुक करून अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटचा पत्ता देणाऱ्या एका सुशिक्षित तरुणाला वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे.

ओला कॅब पाठवणारा तरुण हा सलमान खानचा चाहता असून लॉरेन्स बिष्णोईला अद्दल घडविण्यासाठी त्याने ही कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. न्यायालयाने या तरुणाला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

रोहित त्यागी (२१) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथे राहणारा आहे. ‘बीबीए’च्या शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेणारा रोहित त्यागी हा सलमान खानचा खूप मोठा चाहता आहे. मागील काही दिवसांपासून रोहित हा सलमान खान संदर्भातील बातम्या बघत होता.त्याला सलमान खान याची चिंता लागली होती, त्यातच त्याने लॉरेन्स बिष्णोई या गँगस्टरला अद्दल घडविण्याचे ठरविले.

या साठी गुरुवारी सकाळी रोहित याने गाजियाबाद येथून मुंबईचे लोकेशन देऊन ओला कॅब बुक केली होती, वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंट येथून लॉरेन्स बिष्णोई याला घेऊन वांद्रे पोलीस ठाण्यात आणायचे असल्याचे त्याने ओला कॅब चालकाला सांगितले होते.

ओला कॅब चालकाने सांगितल्या प्रमाणे गॅलेक्सी अपार्टमेंट या ठिकाणी कॅब घेऊन आला, व त्याने बाहेर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना लॉरेन्स बिष्णोई इथेच राहतो का ? असा प्रश्न विचारला, कॅब चालकाच्या प्रश्नाने गोंधळलेल्या पोलिसांनी तात्काळ कॅब चालकाला ताब्यात घेऊन वांद्रे पोलीस ठाण्यात घेऊन आले. त्याच्याकडे चौकशी करण्यात आली असता त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ओला बुक करणाऱ्या व्यक्तीची माहिती काढली असता रोहित त्यागी नावाच्या व्यक्तीने उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथून ओला कॅब बुक केल्याची माहिती समोर आली.

हे ही वाचा:

मुंबईचा पैसा, लखनौची जमीन, ठाकरेंच्या नावाने गलका…

छगन भुजबळांची नाशिकमधून माघार, गोडसेंचा मार्ग मोकळा!

बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्यावरून वाद, तरुणाची गोळ्या झाडून हत्या!

सुनेला हिणवणाऱ्या शरद पवारांना सीतामाईंबद्दल कळवळा येणे म्हणजे ढोंगीपणाचा कळस!

वांद्रे पोलिसांनी प्रथम गुन्हा दाखल करून पोलिसांचे एक पथक यूपीला रवाना करण्यात आले. या पथकाने गाजियाबाद येथून रोहित त्यागी या तरुणाला ताब्यात घेऊन शुक्रवारी मुंबईत आणून त्याला अटक करण्यात आली.

रोहितला वांद्रे न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. रोहित त्यागी हा विद्यार्थी असून बीबीए च्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. तो सलमान खान चाहता असून सलमान खानच्या जीवाला लॉरेन्स बिष्णोई पासून धोका असल्यामुळे लॉरेन्सला अद्दल घडविण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा