33 C
Mumbai
Tuesday, November 5, 2024
घरक्राईमनामामुंबईला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा तरुण अटकेत

मुंबईला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा तरुण अटकेत

Google News Follow

Related

सांताक्रूझ पश्चिमेतील एका कपडे व्यापाऱ्याला व्हिडीओ कॉल करून एकाने मुंबईत बॉम्बने उडवण्याची धमकी दिली होती. त्या धमकी देणाऱ्या तरुणाला मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. सध्या त्याची चौकशी सुरु असून त्यासंबंधी  अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

या तरुणाने यापूर्वी व्हिडिओ कॉल करून सांताक्रूझ येथील एका व्यक्तीला फोन करून मुंबई बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. मुंबईसह संपूर्ण देशाला धोका देणार असल्याचे त्याने सांगितले होते. तेव्हापासून हे फोन नेमके कोणाचे होते याचा तपास मुंबई गुन्हे शाखा करत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि पोलिसांनी या धमकी देणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले.

गुन्हे शाखा पोलिसांच्या हाती लागलेल्या माहितीनुसार, रणजीत कुमार साहनी (२५) असे धमकी देणाऱ्या आरोपीचे नाव असून तो बिहारचा आहे. बिहारमधील रहिवासी असलेल्या आरोपीने व्हाट्सअप व्हिडिओ कॉलद्वारे बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली होती. क्राईम ब्रँचच्या तपासानुसार, साहनीने हा फोन हैदराबादमधून केला होता. फोन करून तो ट्रेनमध्ये चढला आणि मुंबईच्या दिशेने निघाला. साहनी मुंबईत आल्याची माहिती मिळताच मुंबई गुन्हे शाखेने त्याचा शोध सुरू केला. अखेर मोबाईल लोकेशनच्या मदतीने साहनीला दक्षिण मुंबईतील चर्नी रोड परिसरातून अटक करण्यात आली.

हे ही वाचा:

मुंबई को बॉम्ब से उडा देंगे, कपडे व्यापाऱ्याला आला व्हिडीओ कॉल

हेल्पलाईन आपची आणि ताप जबलपूरच्या तरुणाला

बारावीनंतर विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना करता येणार नोकरी

अमेरिका का म्हणतोय UNSC मध्ये भारताला कायमस्वरुपी सदस्यत्व द्या?

साहनी याने सांताक्रूझ येथील रफत हुसेन याला व्हाट्सअप व्हिडिओ कॉल करून बॉम्बचा स्फोट करून मुंबई उद्‌ध्वस्त करणार असल्याचे सांगितले. यासोबतच त्यांनी देशभरात स्फोट घडवून आणण्याची धमकी दिली होती. या फोन कॉलनंतर कॉल घेणाऱ्या व्यक्तीने मुंबई पोलिसांना माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तक्रारीच्या आधारे व्हाट्सअप व्हिडिओ कॉल करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध आयपीसीच्या कलम ५०६(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा