७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर बेपत्ता झालेली २६ वर्षांची शानी गबाय या तरुणीचा मृतदेह सापडल्याचे वृत्त आहे. शानी गबॉयचा मृतदेह बुधवारी, २२ नोव्हेंबर रोजी सापडला. ही तरुणी किबुत्झ रीम येथे सुरू असलेल्या संगीत सोहळ्यात काम करत होती. येथेच हमासने नृशंस हल्ला केला.
संगीत सोहळ्यावर झालेला हा हल्ला अतिशय क्रूर होता. दहशतवादी घटनास्थळी पोहोचल्यानंतर तेथे एकच हल्लकल्लोळ झाला होता. त्यात सुमारे २६० हून अधिक जण ठार झाले होते. तर, अनेकांचे अपहरण करण्यात आले होते. गाझा पट्टीनजीक आयोजित या सोहळ्याला हजारो लोकांनी हजेरी लावली होती. पॅलिस्टिनी बंदुकधाऱ्यांनी घटनास्थळी धडक देऊन पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आपल्या बंदुकीच्या गोळ्यांनी लक्ष्य केले.
हे ही वाचा:
ब्रिक्स सदस्यत्वासाठी पाकिस्तानचा अर्ज!
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी संबंध; चार सरकारी कर्मचाऱ्यांची हकालपट्टी!
मुख्याध्यापकावर १४२ विद्यार्थीनींनी केला लैंगिक छळाचा आरोप!
नीरव मोदीची संपत्ती ताब्यात घ्यायला पंजाब नॅशनल बँकेला हिरवा कंदील
‘आमची शानी गेली. आम्ही अतीव दुःखात बुडालो आहोत. आम्ही सर्वजण रडत आहोत. आम्हाला विश्वासच बसत नाहीये. याचा वेगळा शेवट होईल, अशी अपेक्षा आम्ही व्यक्त केली होती, पण ते होणार नव्हते,’ अशा शब्दांत महापौर सायमन अल्फासी यांनी भावना व्यक्त केल्या.
तब्बल ४७ दिवस तिचा शोध सुरू होता. मात्र आता तिच्या कटू बातमीने हा शोध संपला आहे. तिचे आईवडील जेकब, मिचल, तिचा भाऊ अविअल आणि बहीण नित्झान हे जवळपास सात आठवडे इस्रायलमध्ये तिचा शोध घेत होते. तिला घरी आणण्यासाठी त्यांनी दिवस-रात्र एक केले होते, असे त्यांनी सांगितले. टाइम्स ऑफ इस्रायलने दिलेल्या वृत्तानुसार, तिच्या मृत्यूआधी तिला ओलिस ठेवण्यात आले होते.