आई वडिलांनी मोबाईल फोन काढून घेतल्याच्या रागात एका विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची घटना मालाड येथे घडली.
इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने इमारतीच्या गच्चीवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मालाड मालवणी परिसरात समोर आली आहे. या विद्यार्थ्यांनीने यापूर्वी देखील मनगटाची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता अशी माहिती समोर आली आहे.
या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. आत्महत्या केलेल्या मुलीचे वय १५ वर्षे असून ती इयत्ता नववी मध्ये एका कॉन्व्हेंट स्कुल मध्ये शिकत होती. आई वडिलांसह मालाड पश्चिम मालवणी येथे राहणाऱ्या मुलीचे वडील मनी ट्रान्सफरच्या दुकानात नोकरी करतात.
बळीत मुलगी ही मोबाईल फोन आणि सोशल मीडियाच्या आहारी गेली होती, दिवस रात्र ती मोबाईल फोन मध्ये सोशल मीडियावर चॅटिंग, व्हिडीओ बघणे यामध्ये गुंतलेली असायची, त्यामुळे तिचे अभ्यासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले होते अशी माहिती स्थानिक सूत्रांनी दिली. तिच्या अश्या वागण्यामुळे दोन दिवसांपूर्वी तिच्या आई वडिलांनी तिच्याजवळून मोबाईल फोन काढून घेतला होता, त्यानंतर ती घरातून रागाने निघून गेली होती. मालाड लिबर्टी गार्डन येथील सात मजली इमारतीच्या गच्चीवरून तिने शनिवारी सायंकाळी उडी घेतली त्यात तिचा मृत्यू झाला.
हे ही वाचा:
एकेकाळी सिलिंडर उचलणाऱ्या रिंकूने आयपीएलमध्ये शिवधनुष्य उचलले
राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा रद्द; तृणमूलही आता प्रादेशिक पक्ष
शिवसेनाभवन, शिवसेनेचा निधी, शाखा एकनाथ शिंदेंना सोपवा!; सर्वोच्च न्यायालयात याचिका
आता गुजरातमध्ये उभी राहतेय भगवान द्वारकाधीशांची १०८ फूट उंचीची मूर्ती
यापूर्वी देखील तिने मनगटाची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता अशी माहिती समोर आली आहे. मोबाईल फोनच्या अतिव्यसनामुळे या मुलीवर मानसिक परिणाम झाला होता, व ती नैराश्यात जात असल्यामुळे तिच्यावर उपचार देखील सुरू होते अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी अपमृत्यु ची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.