गांजा विकायला तरुणीने सोडली इंजिनिअरिंगची नोकरी

गांजा विकायला तरुणीने सोडली इंजिनिअरिंगची नोकरी

झटपट पैसे कमावण्याच्या नादात अनेक सुशिक्षित तरुण गैरमार्गाला जाताना दिसतात. असाच एक धक्कादायक प्रकार कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगलोर मधून समोर आला आहे. चेन्नईच्या एका बड्या कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणीने गांजा विकण्यासाठी आपल्या चांगल्या पगाराच्या नोकरीवर पाणी सोडले. या २५ वर्षीय तरुणीला बंगलोर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी तिने गांजा विक्रीसाठी आपण नोकरी सोडल्याचे आपल्या जबाबात सांगितले.

अटक करण्यात आलेल्या तरुणीचे नाव रेणुका उर्फ आध्या आहे. तिचा प्रियकर सिद्धार्थ हा या संपूर्ण प्रकरणातील मुख्य आरोपी असून त्यालादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सिद्धार्थ हा बंगलोरमधील कॉलेजमध्ये एमबीएचे शिक्षण घेत होता. तिथेच त्याची आणि रेणुकाची भेट झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले.

हे ही वाचा :

मुंबई महापालिकेचा बिनडोक कारभार मुंबईकरांचा कडेलोट करणार

२६ जूनला ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपाचे चक्का जाम आंदोलन

भाजपा आंदोलन करायला आजही घाबरली नाही आणि उद्याही नाही !

अजित पवारांसमोर आरोग्य कर्मचाऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर रेणुकाने एका खासगी कंपनीत नोकरी करण्यास सुरुवात केली तर सिद्धार्थ याने ड्रग्सची तस्करी करण्यास सुरुवात केली. पण रेणुकाला कंपनीतून मिळणाऱ्या पगारात ती समाधानी नव्हती. तिच्या उत्पन्नातून तिच्या आणि परिवाराच्या गरजा भागत नसल्याची भावना रेणुकाला सतावत होती. तिच्या याच मनस्थितीची फायदा तिच्या प्रियकर सिद्धार्थने घेतला. सिद्धार्थने तिला ड्रग्सच्या धंद्यात येण्यास मनवले. रेणुकाही पैशाच्या मोहाला बळी पडली आणि ड्रग्सच्या तस्करीत उतरली.

काही दिवसांपूर्वी पोलिसांना रेणुका ही ड्रग्स पुरवण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तिच्यासाठी सापळा रचला. बंगलोरमधील आयटीआय कॉलेजजवळ रेणुकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले. तिच्या जवळून २.५ किलो गांजा आणि ६,५०० रुपये असा ऐवज सापडला.

 

Exit mobile version