भारत वर्ल्डकप हरल्याच्या रागात मोठ्या भावानं केली सख्ख्या लहान भावाची हत्या!

अमरावतीतल्या अंजनगाव बारीत येथील घटना

भारत वर्ल्डकप हरल्याच्या रागात मोठ्या भावानं केली सख्ख्या लहान भावाची हत्या!

अमरावतीतल्या अंजनगाव बारीत धक्कादायक घटना घडली.वर्ल्डकप हरल्याच्या रागात मोठ्या भावानं केली सख्ख्या लहान भावाची हत्या केली आहे.या घटनेमुळे भागात एकच खळबळ माजली आहे.या प्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

वर्ल्डकप फायनलमध्ये टीम इंडियाच्या पराभवामुळे अनेकांचे स्वप्न भंग पावले आहे.तसेच भारताच्या पराभवामुळे ओदिशा आणि पश्चिम बंगालमधील दोन तरुणांनी आत्महत्या देखील केल्याची घटना आहे.मात्र, अमरावतीमध्ये एक अजबच घटना घडली.भारताच्या पराभवामुळे सख्ख्या मोठ्या भावाने आपल्या लहान भावाची हत्या केली आहे.मटण खाऊन आला म्हणून भारत हरला असं म्हणत दोघ्या सख्ख्या भावांचा वाद सुरू झाला.भावांचा वाद विकोपाला गेला अन अनुचित प्रकार घडला.

हे ही वाचा:

ललित पाटील प्रकरणी पुणे पोलीस दलातील दोन पोलीस कॉन्स्टेबल्स बडतर्फ

मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश गृहमंत्री फडणवीसांचे नाहीत!

अबब!! १९२६ सालच्या दुर्मिळ मॅकलन व्हिस्कीसाठी मोजले २.७ मिलियन डॉलर्स

भारताकडे येणाऱ्या मालवाहू जहाजाचे हौथी दहशतवाद्यांकडून अपहरण

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अंजनगाव बारीत हा प्रकार घडला.टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया हा वर्ल्डकपचा अंतिम सामना आपण गमावला. तुम्ही मटण खाऊन आले म्हणूनच आपण हरलो, असं म्हणत दोघा भावात वाद सुरु झाला.रागाच्या भरात प्रवीण इंगोले या मोठ्या भावाने त्याचा सख्ख्या लहान भाऊ अंकित इंगोले (२८) याच्यावर लोखंडी सळईनं हल्ला केला.या हल्ल्यात लहान भावाचा मृत्यू झाला तर त्याचे वडील रमेश इंगोले हे गंभीर जखमी झाले आहेत.या प्रकरणी पोलिसांनी प्रवीण इंगोले यास अटक केली आहे.मात्र, या धक्कादायक घटनेमुळे भागात खळबळ उडाली आहे.

 

Exit mobile version