27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामा'योगी आदित्यनाथ १० दिवसात राजीनामा द्या, अन्यथा बाबा सिद्दिकी सारखी हत्या करू'

‘योगी आदित्यनाथ १० दिवसात राजीनामा द्या, अन्यथा बाबा सिद्दिकी सारखी हत्या करू’

मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला अज्ञात नंबरहून धमकीचा मेसेज

Google News Follow

Related

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सतर्क आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. अशातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाकडे ही धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुंबई पोलीस शोध घेत आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर निवासस्थानी नुकतीच सुरक्षा वाढवण्यात आली आहे. एसआयडीच्या गोपनीय रिपोर्ट्सनंतर फोर्स वनच्या १२ जवानांची अतिरिक्त टीम उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवासस्थानी तैनात करण्यात आली आहे. याच दरम्यान, युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी आली आहे. शनिवारी (२ नोव्हेंबर) संध्याकाळी मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला हा धमकीचा मेसेज आला. अज्ञात नंबरहून धमकीचा मेसेज आला आहे.

हे ही वाचा : 

केंद्रीय गृहमंत्र्यांवरील आरोपांप्रकरणी भारताने कॅनडाच्या अधिकाऱ्याला बजावले समन्स

दुबईहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात सापडली काडतुसे

जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा

‘इम्पोर्टेड माल’ विधानावरून अरविंद सावंतांनी मागितली माफी

‘योगी आदित्यनाथ १० दिवसात राजीनामा द्या, अन्यथा बाबा सिद्दिकी सारखी हत्या करू’, असे मेसेजमध्ये म्हटले आहे. या मेसेजनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबई पोलीस धमकी देणाऱ्याचा शोध घेत आहेत. युपी पोलिसांनीही माहिती घेतल्यानंतर सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचे आणि धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सुरु केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा