पोलादपूरजवळील कशेडी घाटात चोळई येथे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला काल रात्री अपघात झाला.
दापोलीवरून मुंबईला येत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला.काही दिवसांपूर्वी जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात झाला होता. नुकताच धनंजय मुंडे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला होता,पुढील उपचारांसाठी त्यांना मुंबईला आणले होते. आता आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात झाला आहे.
काल शुक्रवारी रात्रीच्या सुमारास आमदार योगेश कदम यांच्या गाडीला पोलादपूरजवळ कशेडी घाटात अपघात झाला. सध्या आमदार योगेश कदम त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असून ते किरकोळ जखमी झाले आहेत.
कदम खेडकडून मुंबईला निघाले असता कशेडी घाटात पोलादपूर नजीक चोळई येथे मागून येणाऱ्या कदम यांच्या वाहनाला टँकरने जोरदार धडक दिली. त्यामुळे टँकर पलटी झाला. टॅंकरचा चालक पळून गेला पळून गेला असून त्याचा शोध सुरु आहे.
आज दापोलीहून मुंबईला जात असताना माझ्या वाहनाचा अपघात झाला…देव कृपेने आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या अपघातातून मी व माझे सहकारी सुखरूप बचावलो…माझ्या पुढील सर्व कार्यक्रमांना मी नियोजित वेळेत हजर राहणार आहे.
— Yogesh Ramdas Kadam (@iYogeshRKadam) January 6, 2023
देवकृपेने आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या अपघातातून मी आणि माझे सहकारी सुखरूप बचावलो. माझ्या पुढील कार्यक्रमाना मी नियोजित वेळी हजर राहणार असे ट्विट आमदार योगेश कदम यांनी केले आहे.
हे ही वाचा:
बावनकुळेंविषयी केलेले ट्विट आव्हाड यांनी केले डीलिट; औरंगजेबाची कबर असल्याचा केला होता दावा
पोस्टरवरच्या अंगप्रदर्शनाला आक्षेप घेणारा महिला आयोग उर्फीबाबत गप्प?
अयोध्येत उभे राहणार ‘महाराष्ट्र भवन’
काँग्रेसला भगव्या रंगाचा इतका तिरस्कार का?
आमदार योगेश कदम यांच्या गाडीला धडक लागल्याने त्यांची गाडी त्यांच्या पुढे असलेल्या पोलीस गाडीवर धडकली.आमदार कदम यांच्या गाडीचे मागच्या बाजूला धडकल्यामुळे थोडे नुकसान झाले आहे.अपघाताच्या घटनेचा पोलीस तपास करत आहेत. योगेश कदम हे या अपघातात सुखरुप आहेत,अशी माहिती मिळाली आहे.
योगेश कदम हे खेड दापोली-खेड-मंडणगड मतदारसंघाचे आमदार आहेत.आमदार योगेश कदम हे माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र आहेत.