नकली नोटांचा वापर बहुदा चित्रपट शूटिंगच्या वेळी किंवा शाळेतल्या विद्यार्थ्याना नोटांची ओळख व्हावी म्हणून केली जाते. पण गोरेगाव मधील येस बँकेच्या एटीएम मशीन ने चक्क लहान मुलांच्या खेळण्यातल्या नोटा मशीन मध्ये भरण्यात आल्याचे चित्र समोर आले. गोरेगांव येथील येस बँकेच्या बाहेर पैसे काढण्यासाठी किंवा पैसे भरण्यासाठी एटीम मशीन लावण्यात आली आहे. एटीएम मशीनमध्ये कर्मचारी नेहमी प्रमाणे पैसे भरण्यासाठी आले असता, त्यांना १०० रुपयांच्या ६६ नोटा आढळून आले आहेत. एटीएम मशीनने अशा नोटा स्वीकारल्याच कशा या बाबत दिंडोशी पोलिस अधिक तपास करत आहेत.
मुंबईतील गोरेगाव शाखेच्या बाहेर एटीएम मशीन बसवण्यात आली आहे. ग्राहकांना बँकेमध्ये पैसे भरण्यासाठी कॅश काऊंटर जास्त वेळ जाऊ नये, यासाठी बँकेच्या बाहेर कॅश डिपॉजिट मशीन बसवण्यात आली आहे. तसेच या मशीन मधून रक्कम जमा करू शकतात किंवा जमा केलेली रक्कम काढू शकतात. तसेच या मशीनमध्ये जमा केलेली रक्कम काढून नेण्याचे काम चेंबुर येथील ‘करन्सी चेस्ट’ या कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीचे कर्मचारी आणि अधिकारी एटीएम मध्ये पैसे भरण्यासाठी आले असता १ सप्टेंबर रोजी ही घटना घडली.
अधिकाऱ्यांनी नोटा तपासल्या असता त्यावर ‘भारतीय बच्चो का खाता’ असे इंग्रजीत आणि हिंदीमध्ये लिहिलेले आढळले. तसेच ज्या व्यक्तीच्या बँक खात्यात हे पैसे भरले होते. त्या व्यक्तीचा नकली पैशांशी काही संबंध आहे का याची पोलिस चौकशी करत आहेत. तसेच या नोटांवरही महात्मा गांधीजीच्या फोटोखाली ‘फक्त चित्रीकरणासाठी’ असे इंग्रजीमध्ये लिहिण्यात आले आहे. तसेच या नोटांच्या दोन्ही बाजूला ‘कॅश हब चेंबूर’ असा शिक्का मारला आहे.
हे ही वाचा
नवरात्र २०२२: सतीचे दात इथे पडले म्हणून दंतेश्वरी शक्तीपीठ
सी- लिंकवर झालेल्या विचित्र अपघातात पाच जणांचा मृत्यू
दुसऱ्या महायुद्धाच्या ८३ वर्षांनंतर पोलंडची जर्मनीकडे १.३ ट्रिलियन डॉलर्सच्या नुकसान भरपाईची मागणी
२४ वर्षांनंतर अनुकंपा तत्वावर नोकरी मागणाऱ्या तरुणीला फटकारले
येस बँकेच्या अधिकाऱ्यांनी खेळण्यातल्या नोटा बँकेत जमा केल्या प्रकरणी, फसवणुकीचा गुन्हा दिंडोशी पोलिसांनी दाखल करून घेतला आहे. या प्रकरणामुळे मशीनच्या विश्वासाहर्ताबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. तसेच या मशीनने खेळण्यातल्या नोटा स्वीकारल्याच कशा याबाबत शंका निर्माण होत आहे. तसेच संबंधित व्यक्ति बँक खातेदारांच्या परिचयाचे आहेत का हे देखील पोलिस तपासणार आहेत.