हिंदू आणि जैन मंदिरांमधून मूर्तींची चोरी करणाऱ्या दोन जणांना अहमदाबादमध्ये पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यासीन शेख (वय ३२ वर्षे) आणि अमीन पठान अशी या दोन अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. शिवाय त्यांच्या टोळीतील तिसऱ्या आरोपीला पश्चिम बंगालमध्ये अटक करण्यात आल्याची माहिती आहे. त्याचे नाव अहसामुद्दीन आहे.
गुजरातच्या नवसारी येथे जैन मंदिरात झालेल्या चोरीनंतर या टोळीचे कारनामे उघड झाले होते. बिलिमोरा येथे पोलिसांकडे चोरीची तक्रार करण्यात आली होती. चोरांनी त्या ठिकाणाहून मूर्तीसोबत अन्य मौल्यवान वस्तूंची चोरी केली होती. त्यासोबत गांधीनगरच्या अदालज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका मंदिरांला आरोपींनी लक्ष्य करत महागड्या वस्तूंची चोरी केली होती. या चोरांच्या तपासासाठी अहमदाबाद गुन्हे शाखेच्या पथकाला पाठवण्यात आले होते.
तपासानंतर पोलिसांनी अमीन पठान आणि यासीन शेख नावाच्या आरोपींना अटक केली. हे दोन्ही आरोपी मूळचे पश्चिम बंगालचे रहिवाशी आहेत. सध्या ते अहमदाबाद चंदोलाजवळील बंगाली कॉलेनीत राहत होते. या दोघांच्या चौकशीनंतर त्यांनी तिसऱ्या आरोपीची माहिती दिली, ज्याचे नाव अहसामुद्दीन शेख आहे. या टोळीने अनेक जैन आणि हिंदू मंदिरांना लक्ष्य केले असून त्यांच्याकडे अनेक ठिकाणच्या मूर्ती सापडल्या.
हे ही वाचा:
भारत- चीन करारानंतर सीमेवर ‘सब शांती शांती है!’
चिन्मय कृष्णा दास यांच्या बाजूने लढणाऱ्या बांगलादेशी वकिलावर बांगलादेशात हल्ला
मालेगाव व्होट जिहाद घोटाळा: नामको बँकेच्या व्यवस्थापकासह सहव्यवस्थापकाला अटक
एकनाथ शिंदेंशी कोणतेही मतमतांतर नाही…आमचा शपथविधी दिमाखदार होईल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपींविरोधात पहिल्यापासून १२ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. मात्र, यावेळी अटकेनंतर अमीन पठाण आणि यासीन शेखजवळ सुमारे सात लाख रुपयांचे सामान सापडले. हे सामान मंदिरात चोरी करून मिळवण्यात आले होते. दोन्ही आरोपींवर पाच मोठे गुन्हे दाखल होते. ज्याचा आता तपास संपला आहे.