मालामाल यशवंत जाधव ; १३० कोटींपेक्षा अधिक संपत्ती असल्याचा दावा

मालामाल यशवंत जाधव ; १३० कोटींपेक्षा अधिक संपत्ती असल्याचा दावा

मुंबई महानगर पालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते, नगरसेवक यशवंत जाधव यांच्या घरावर टाकण्यात आलेल्या आयकर खात्याच्या धाडीत जाधव यांची मालमत्ता १३० कोटींपेक्षा अधिक असल्याचे समोर येते आहे.

आयकर खाते गेले काही दिवस जाधव यांच्या घरावर छापेमारी करत असून त्यात अनेक कागदपत्रे त्यांच्या हाती लागली आहेत तसेच जाधव यांच्या संपत्तीचे नवनवे आकडे समोर येत आहेत. आयकर विभागाने यशवंत जाधव यांच्या मुंबईतील 32 मालमत्तांवर धाडी टाकल्या होत्या. हे धाडसत्र जवळपास ३-४ दिवस सुरू होते. या कारवाईत आयकर विभागाने अनेक कागदपत्र ताब्यात घेतली आहेत.

आयकरच्या धाडीत जाधव यांच्या मालकीची तीन डझनहून अधिक अशी वेगवेगळी मालमत्ता असल्याचे आयकर खात्याला आढळले असून त्याची किंमत १३० कोटींपेक्षा जास्त असल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली आहे.

मुंबई महानगरपालिकेचे कंत्राटदार आणि यशवंत जाधव यांच्यात साटेलोटे असल्याचे आयटीच्या रडारवर आले आहे. मात्र जे व्यवहार झाले आहेत त्याची नोंद आयटीला सापडलेली नाही.  आयटीच्या प्राथमिक तपासात कंत्राटदारांनी २०० कोटींपेक्षा अधिकची कमाई चुकीच्या पद्धतीने मिळवली असा आरोप आहे. या छापेमारीच्या कारवाईत आयटीने २ करोड रुपयांची रोख रक्कम आणि दीड कोटी रुपयांचे दागिने जप्त केल्याचेही स्पष्ट झाले आहे.

हे ही वाचा:

‘महाविकास आघाडी सरकार हे दाऊदला शरण आलेलं सरकार आहे’

अधिवेशनापूर्वी नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचे आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशिया राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यात चर्चा; या विषयांवर केली चर्चा

संजय राऊत पुतीनला दम केव्हा देणार?

 

या कारवाईत हवाला रॅकेटमधून पैसे वळवले जात असल्याचंही तपासात स्पष्ट झाले आहे.

माझगाव येथील जाधव यांच्या घरावर गेले काही दिवस आयकर खात्याची ही कारवाई सुरू आहे. किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जी आरोपांची मालिका सुरू केली आहे. त्यात जाधव यांचे नावही समाविष्ट होते. जाधव यांची पत्नी व आमदार यामिनी जाधव या दोघांच्याही संपत्तीची तपासणी आयकर खाते करत आहे.

Exit mobile version