कुस्तीगीराच्या हत्येआधी सुशीलकुमारने स्टेडियममध्ये कुत्र्यांवर गोळ्या झाडल्या होत्या…

कुस्तीगीराच्या हत्येआधी सुशीलकुमारने स्टेडियममध्ये कुत्र्यांवर गोळ्या झाडल्या होत्या…

भारताचा ऑलिम्पिकवीर कुस्तीगीर सुशील कुमार दिवसेंदिवस नवनव्या अडचणीत सापडत आहे. एका खेळाडूची हत्या व अपहरण प्रकरणात तुरुंगात असलेल्या सुशीलकुमारविरोधात दिल्ली पोलिसांनी जे पुरवणी आरोपपत्र दाखल केले त्यात अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा झाला आहे.

या आरोपपत्रात पोलिसांनी म्हटलेले आहे की, ५ मे २०२१ला ज्युनियर कुस्तीगीर सागर धनकर याच्या मृत्यूपूर्वी सुशीलकुमार हा छत्रसाल स्टेडियममध्ये पोहोचला होता आणि त्याने तेथे भुंकणाऱ्या कुत्र्यांवर गोळ्या झाडल्या होत्या. शिवाय, पिस्तुलाचा धाक दाखवून तिथल्या कुस्तीगीरांना धमकावले होते. या ज्युनियर कुस्तीगीरांना स्टेडियम सोडण्यासही त्याने सांगितले होते.

रोहिणी न्यायालयात हे आरोपपत्र पोलिसांनी सादर केले. त्यात पोलिसांनी सुशीलचे सुरक्षारक्षक अनिल धीमन आणि इतर आरोपींनी दिलेल्या जबानीवर काही महत्त्वपूर्ण मुद्दे समाविष्ट केले आहेत.

हे ही वाचा:

विवो आयपीएल आता टाटा आयपीएल

आर्थर रोड तुरुंगातील २७ कैद्यांना कोरोनाचा संसर्ग

मोलनुपिरावीर उपयुक्त की धोकादायक?

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण

अनिल धीमनने जी जबानी दिली त्यानुसार तो २०१९पासून सुशीलसोबत सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. स्टेडियममध्ये आल्यानंतर भुंकणाऱ्या कुत्र्यांवर त्याने गोळ्या झाडल्याचे धीमनने पाहिले होते. त्या रात्री (४-५ मे २०२१) सुशीलने अनेकांना स्टेडियममध्ये बोलावले होते. कुणाला तरी धडा शिकविण्याची तो भाषा करत होता. धीमनने सांगितले की, सुशीलच्या आदेशानुसार आम्ही आणि इतर लोक शालिमार बागला गेलो आणि आम्ही अमित तसेच रविंदर यांना मारहाण केली. त्यानंतर मॉडेल टाऊनमध्ये सागर, जयभगवान आणि सोनू यांचे अपहरण केले आणि त्यांना स्टेडियममध्ये आणले. धीमनने सांगितले होते की, आम्ही या तिघांना अपहरण करून आणल्यावर लाठ्या काठ्यांनी, हॉकी स्टिक्स, बेसबॉल स्टिक्सनी मारहाण केली. सागर आणि जयभगवान यांना ठार मारणे हाच आमचा उद्देश होता कारण तसेच सुशीलला वाटत होते. सुशीलला भीती होती की, सागर आणि जयभगवान हे त्याची माहिती गोळा करून त्याच्या जीवाला धोका पोहोचविणार आहेत. धीमन या जबानीत असेही म्हणाला की, ही मारहाण होत असताना सुशील म्हणत होता की, त्याला (सागर) जिवंत ठेवू नका, दया-माया न दाखवता मारा.

२४ मे रोजी सुशीलकुमारला अटक करण्यात आली. त्याच्यावर अपहरण, खून व कट रचल्याचे आरोप आहेत.

Exit mobile version