मुंबई पोलीस वाहतूक नियंत्रणाला पाकिस्तानकडून २६/११ सारख्या दहशतवादी हल्ल्याचा धमकीचा संदेश मिळाल्यानंतर वरळी पोलिसांनी शनिवारी भा.दं.वि कलम ५०६(२) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. हा मेसेज पाकिस्तानमधील माेबाईल क्रमांकावरून वाहतूक पाेलिसांना आला हाेता. दरम्यान या धमकी प्रकरणी पाेलिसांनी विरारमधून एका संशयिताला ताब्यात घेतलं असल्याची माहिती मिळत आहे.
शहर पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्याने ही तक्रार दाखल केली आहे. उल्लेखनीय म्हणजे, शनिवारी वाहतूक नियंत्रण शाखेला पाकिस्तानी नंबरवरून धमकीचा संदेश मिळाला, ज्यामध्ये मुंबईतील २६/११ स्टाईल हल्ल्याचा इशारा देण्यात आला होता राज्यभरात दहीहंडीचा उत्सव आनंदात साजरा करत असतानाच त्या दिवशी रात्री वरळीच्या वाहतूक नियंत्रण शाखेमध्ये हा धमकीचा मेसेज आला हाेता. दहीहंडीनंतर गणपती, नवरात्राैत्सव, दिवाळी असे एकामागून एक सण येत आहेत. ऐनसणासुदीच्या पार्श्वभूमीवर हा संदेश आल्यामुळे खळबळ माजली आहे.
हे ही वाचा:
१४ तास तपास; सिसोदियांना अटक होणार?
कंबोज यांच्यानंतर आता निंबाळकरांचा ईडीस्फोट
निर्बंधमुक्त दहीहंडीमुळे गोविंदा घेतायत मोकळा श्वास
लोकांना डोलो देऊन डॉक्टरांनी केली १ हजार कोटींची मज्जा
वाहतूक नियंत्रण शाखेला आलेल्या या मेसेजमध्ये भारतातील सहा लाेक या हल्ल्यासाठी मदत करणार असल्याचं दहशतवाद्यांनी म्हटलं आहे. दोन दिवसांपूर्वीच हरिहरेश्वर किनाऱ्याजवळ एक बोट भरकटून आल्याचे समोर आले होते मात्र या बोटीत शस्त्रसापडल्यामुळे खळबळ माजली हाेती. यानंतर रायगड आणि आसपासच्या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला होता. पाेलिस बंदाेबस्तात वाढ करण्यात आली हाेती. आता हा धमकीचा संदेश आल्यानंतर पाेलिस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.
मुंबई शहर पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी पत्रकार परिषदेत संदेश प्राप्त झाल्यानंतर राज्य दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि शहर पोलिस कर्मचारी सतर्क झाले आहेत. आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेतलेलं असल्याचे ते म्हणाले आहेत.