ग्राईंडरमध्ये अडकून झालेल्या मृत्यू प्रकरणी मालकाविरोधात गुन्हा

कामगाराला ग्राइंडरचे काम करण्याचा अनुभव नव्हता

ग्राईंडरमध्ये अडकून झालेल्या मृत्यू प्रकरणी मालकाविरोधात गुन्हा

वरळी कोळीवाड्याजवळील नरिमन भाट नगर येथे ग्राईंडरमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी दादर पोलिसांनी रविवारी मालक सचिन कोठेकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अग्निशमन दलाला घटनास्थळी बोलावून त्या मजूराला बाहेर काढण्यात आले होते. त्याला ग्राईंडर चालवण्याचा कोणताही अनुभव नसताना त्याला जोखीम असलेले काम देण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

महेश यादव मृत कामगाराच्या चुलत भावाच्या तक्रारीवरून याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, महेश यादव हा देखील गेल्या पाच वर्षांपासून सचिन कोठेकर यांच्याकडे चायनीज खाद्यपदार्थांसाठी लागणारा कच्चा माल बनवण्याचे काम करतो. त्याच्यासोबत पाच जण तेथे काम करतात.

चायनीज पकोडे बनवण्यासाठी पीठ मळणे, कोबी, फ्लॉवर बारीक करणे यासाठी नरीमन भाटनगर येथील अमर संदेश मंडळाजवळील एका खोलीमध्ये इलेक्ट्रीक ग्राईंडर ठेवण्यात आला होता. यादवच गेल्या पाच वर्षांपासून ग्राईंडरवर काम करतो. आरोपी सचिन कोठेकरने शनिवारी हा कच्चा माल आणण्यासाठी सूरज यादव या कामगाराला पाठवले. पण बराच वेळ झाला, तरी तो सूरज यादव हा परत आला नाही.

हे ही वाचा:

देशभरात मुलं विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, ८ महिलांसह ९ जणांना अटक

विरोधकांनी राजकारण करायचे ठरवले तर राजकीयच उत्तर मिळणार

१९९१चा प्लेसेस ऑफ वर्शिप कायदा म्हणजे न्यायाच्या मार्गात ठोकलेली पाचर…

दाऊदच्या दानिश चिकनाला ड्रग्स प्रकरणात डोंगरीतून अटक!

चायनीज पकोड्याच्या गाडीवर कार्यरत असलेल्या सचिनला अखेर दूरध्वनी आला. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने सूरज ग्राईंडरमध्ये अडकल्याचे सांगितले. त्यानुसार सर्वजळ घटनास्थळी गेले असता सूरज डोक्यापासून ग्राईंडरमध्ये अडकला होता. त्याला ग्राईंडरमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण तो बाहेर निघाला नाही. अखेर अग्निशमनदलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी सूरजला ग्राईंडरमधून बाहेर काढून रुग्णवाहिकेतून परळ येथील केईएम रुग्णालयात नेले. तेथे दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सूरजला ग्राईँडर चालवण्याचा कोणताही अनुभव नसताना त्याला ग्राईंडरमधून कच्चा माल काढण्यास सांगितले. त्यामुळे सूरजचा मृत्यू झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी मालक सचिन कोठेकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दादर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version