महिला आयोगाचे पोलिसांना आदेश

४८ तासात शिरसाटांबद्दल अहवाल द्या

महिला आयोगाचे पोलिसांना आदेश

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यानी बीडच्या परळी पोलीस स्थानकात जाऊन शिरसाट यांच्याविरोधात तक्रार दाखल करून घ्यावी अशी मागणी केली होती. आता यासंदर्भात महिला आयोगाने या प्रकरणी पुढील ४८ तासात  चौकशी  करून अहवाल देण्याबाबतचे आदेश महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी संभाजी नगर पोलीसांना दिले आहेत.

आज छत्रपती संभाजी नगर मध्ये आमदार संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्यावर वाईट भाषेत टीका केली त्याबाबत सुषमा अंधारे यांनी महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली. सध्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील महिलेचा अपमान करून खच्चीकरण करण्याचा प्रकार दिसून येतो आहे. महिला आयोगाने कोणत्याही महिलेबाबत लोकप्रतिनिधींकडून अशा भाषेचा वापर करणे हि एक गंभीर बाब असल्याचे आयोगाने म्हंटले आहे. याची दाखल घेतली गेली असून याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश छत्रपती संभाजी नगर पोलीस आयुक्त यांना देण्यात आल्याचे आणि या कार्यवाहीचा ४८ तासांत आयोगाच्या कार्यालयात पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना काढले महाविकास आघाडीतून ‘बाहेर’

ऍड. गुणरत्न सदावर्ते यांची सनद दोन वर्षांसाठी रद्द

बिग बँग थिअरीमध्ये माधुरी दीक्षितबद्दल आक्षेपार्ह भाषा, रागावलेल्या चाहत्याने उचलले हे पाऊल

ठाकरे, पवार यांनी राहुल गांधींकडून माफी वदवून घ्यावी

काय आहे घटना?
आज छत्रपती संभाजी नगर इथल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बोलताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ‘ ती बाई सगळेच माझे भाऊ आहे म्हणते सत्तार माझेच भाऊ आहेत, भुमरे पण भाऊ पण त्या बाईने काय काय लफडी केली आहेत. तिलाच माहिती अश्या भाषेत टीका शिरसाठ यांनी अंधारेंवर केली. यावर सुषमा अंधारे यांनी तक्रार दाखल करण्यासाठी परळी पोलीस स्थानकात गेल्या असता पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करून घेतली नाही. त्यावर सुषमा अंधारे यांनी कुठल्याही पोलीस स्थानकांत तक्रार दाखल होत नाही पोलिसांचे कर्मचारी वरिष्ठांना विचारून घेतो असे उत्तर देतात इथे किती महिला सुरक्षित आहेत देवेन्द्रजी आपण इकडे लक्ष द्याल का कि हे सगळे आपल्याच आशीर्वादाने चालू आहे असा सवाल त्यांनी केला.

Exit mobile version