बोरिवली येथील महिलेला बँकेने सील केलेले फ्लॅट स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून ५१ वर्षीय महिलेला ४७ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या संबंधित प्रकरणामध्ये गीता यादव या महिलेविरुद्ध समतानगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला असून, तपासणीला सुरुवात केली आहे. लवकरच ह्या घटनेसंबंधित पोलिसांकडून जबाब नोंदवण्यात येणार आहेत.
स्वप्ना देसाई ही महिला बोरिवली येथे राहते. देसाई यांचे पती २०१७ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मृत पावले. त्यांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यसवसाय असून, काही कारवास्तव तो ठप्प झाला. याच दरम्यान तिच्या पतीची गीता यादवशी ओळख झाली होती. बँकेने सील केलेले एक फ्लॅट स्वस्तात देण्याचे आश्वासन तिने दिले होते.
हे ही वाचा:
पार्थ चॅटर्जीची निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी चालवत हाेती १२ बनावट कंपन्या
तेजस्वी सूर्याने केला मोदींचा लाल चौकातील ‘तो’ फोटो शेअर
लोकसभेत फलकबाजी; काॅंग्रेसचे चार खासदार निलंबित
खासदारांच्या घरांवर मोर्चे काढण्याचा अधिकार कुणी दिला ?
गीताने कांदिवली येथील ठाकूर कॉम्प्लेक्स, डिंपल आर्केड इमारतीमध्ये एक कार्यालय होते. तिने अजून काही फ्लॅट दाखवले. त्यामध्ये बोरिवली येथील हरिदास नगर, कोरा केंद्र, सोनी टॉवर येथील इमारतीमधील फ्लॅट ११०१ दाखविला होता. संबंधित बँकेने हा फ्लॅट सील केला असून तोच फ्लॅट कमी पैशात मिळवून देईन, असे सांगितले होते. यासाठी योगीनगर येथील फ्लॅट ७४ लाखांना विकला. त्यातून आलेले ४७ लाख रुपये त्यांनी गीताला सोनी टॉवरच्या फ्लॅटसाठी दिले. मात्र दिलेल्या मुदतीत फ्लॅटचा ताबा दिला नाही. संबंधित प्रकरणांचा पोलीस पुढील तपास करीत आहेत.