29 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरक्राईमनामा...म्हणून पाकिस्तानात मुलींच्या कबरीलाही पालकांनी लावले कुलूप !

…म्हणून पाकिस्तानात मुलींच्या कबरीलाही पालकांनी लावले कुलूप !

पाकिस्तानमध्ये नेक्रोफिलियाची प्रकरणे वाढत असल्याचे अहवालातून समोर आले आहे.

Google News Follow

Related

पाकिस्तानमध्ये एक त्रासदायक प्रवृत्ती उदयास आली आहे, जिथे काही पालक आपल्या मुलींच्या कबरींवर टाळे लावत आहेत.अशा घटना पाहता जगातील कोणत्याही शहरातील महिला सुरक्षित नाहीत तसेच उजाडणार प्रत्येक दिवस महिलांसाठी आव्हानात्मक ठरतो हे दिसून येते. तसाच एक विचित्र प्रकार पाकिस्तानमध्ये घडत असल्याने काही सोशल मीडिया युजर्सनी हा मुद्दा अधोरेखित केला आहे.

हॅरिस सुलतान नावाच्या अशाच एका वापरकर्त्याने बुधवारी ट्विट केले,पाकिस्तानने एक असा खडबडीत, लैंगिकदृष्ट्या निराश समाज निर्माण केला आहे की लोक आता त्यांच्या मुलींवर मृत्युनंतरही बलात्कार होऊ नये म्हणून त्यांच्या कबरीवर टाळे लावत आहेत.

पाकिस्तान देशातील काही विकृत वासनेने भरलेले लोक कब्रस्तानातील महिला, मुलींच्या शवावर अत्याचार करत असलेल्या घटना कमी होण्या ऐवजी वाढत आहेत. त्यामुळे धास्तावलेल्या आई-वडिलांना कब्रस्तानात मुलींच्या थडग्यांना टाळे लावण्याची वेळ आली आहे. या प्रकाराविरोधात पाकिस्तानातील बुद्धीजीवींनी आवाज उठवला आहे. हॅरिस सुलतान यांनी फोटो शेअर करत म्हणाले ,पाकिस्तानमध्ये मुली मेल्यानंतर पण सुरक्षित नाहीत. त्यांच्या शवासोबत अत्यंत घाणेरडं कृत्य करण्यात आल्याचं उघड झालं आहे. मृत महिलांचे शव थडग्यातून बाहेर काढून त्यांच्यावर अत्याचार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

हे ही वाचा:

एटीएम ते जीएसटी; महाराष्ट्र दिनापासून होणार चार मोठे बदल !

शंभरीतल्या आजींनी सांगितली ‘मन की बात’, ‘आमचा तुला आशिर्वाद .. सुखी रहा’

केदारनाथ-बद्रीनाथमध्ये जोरदार बर्फवृष्टीमुळे चारधाम यात्रेला ब्रेक

भिवंडीतील इमारत दुर्घटनेत बचावलेल्या मुलांची आईसाठी आर्त हाक

या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने आई-वडिलांनी संताप व्यक्त केला आहे.त्यामुळे पाकिस्तानच नाही तर जगभरातून त्यावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.पाकिस्तानी समाज वासनेने पछाडलेला आहे. यातील काही जण तर अत्यंत किळसवाण्या मानसकितेचे आहे. त्यामुळेच येथील पालकांवर त्यांच्या मुलीच्या थडग्याला जाळी आणि कुलूप लावण्याची वेळ आल्याचे ट्विट त्यांनी केले. आतापर्यंत समाजात महिला सुरक्षित नव्हत्या. पण आता, कब्रस्तानमध्ये पण त्या सुरक्षित नसल्याचा दावा सुल्तान यांनी केला.पाकिस्तानमधील अनेक युझर्सने पाकिस्तानमधील कब्रस्तानात घडणाऱ्या अशा विकृत घटनेचा निषेध करत अशा पुरुषी मानसिकतेवर सडकून टीका केली आहे.

या अगोदरही अशा घटना घडल्या आहेत

२०११ साली याप्रकारची मोठी घटना घडली होती, कराची जवळील नजीमाबाद येथील कब्रस्तानची देखभाल करणाऱ्या मोहम्मद रिजवान या तरुणाने तर ४८ मृत महिलांसोबत अत्याचाराची कबुली दिली होती.अलीकडेच मे २०२२ मध्ये, पाकिस्तानातील गुजरातमधील चक कमला गावात काही अज्ञात व्यक्तींनी एका किशोरवयीन मुलीचे प्रेत खोदून काढले आणि तिच्यावर बलात्कार केला. ज्या रात्री कुटुंबाने मृताचे दफन केले त्याच रात्री हा प्रकार घडला.वर्ष २०१९ मध्ये आणखी एक प्रकरण समोर आले, जेव्हा कराचीच्या लांधी टाऊनमध्ये एका महिलेचा मृतदेह खोदून अज्ञात पुरुषांनी कथितरित्या तिच्यावर बलात्कार केला होता.”नॅशनल कमिशन फॉर ह्युमन राइट्सच्या” मते, ४० टक्क्यांहून अधिक पाकिस्तानी महिलांनी त्यांच्या आयुष्यात किमान एकदा तरी हिंसाचाराचा अनुभव घेतला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा