मंत्रालयासमोर दोन महिलांनी विषप्राशन करण्याचा प्रयत्न केल्यामुळे खळबळ उडाली होती. त्यातील एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
शीतल गादेकर (धुळे) आणि संगीता डावरे (नवी मुंबई) अशा दोन महिला काल मंत्रालयासमोर आल्या होत्या आणि त्यांनी विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना तत्काळ थांबविले. पण, काही प्रमाणात त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केले. त्यामुळे त्यांना तत्काळ जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील शीतल गादेकर यांचा जेजे रुग्णालयात मृत्यू झाला.
धुळ्यातील ही महिला असून जागेच्या वादासंदर्भात त्यांनी अनेकवेळा मंत्रालयाला भेट दिली होती. चेहर्याला मास्क लावून आणि टॅक्सीत बसून त्या दोघी मंत्रालयात आल्या होत्या. दोघीही वेगवेगळ्या जिल्ह्यातील आहेत. तरीही त्या एकाच कथित समाजसेवकाच्या संपर्कात होत्या. संगीता डावरे या नवी मुंबईतल्या असून एका पोलिस कॉन्स्टेबलच्या पत्नी आहेत. सदर पोलिस कॉन्स्टेबलचा पाय एका शस्त्रक्रियेदरम्यान निकामी झाला. त्या डॉक्टरविरुद्ध फौजदारी कारवाई करावी, अशी त्याची मागणी होती.
हे ही वाचा:
पत्रकारांना आता एसटीमधून जावे लागणार ‘उडत उडत’
टोइंग करताना पोलिसालाच पोलिसांचे बनावट ओळखपत्र दाखवले; मग सापडले जाळ्यात
पत्रकारांना आता एसटीमधून जावे लागणार ‘उडत उडत’
उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना काढले महाविकास आघाडीतून ‘बाहेर’
शीतल गादेकर या धुळ्यातील असून, त्यांच्या पतीच्या निधनानंतर, पतीच्या मित्राने जमीन बळकावली, याबाबत कारवाई करावी, अशी त्यांची मागणी होती. (आज त्यांचा मृत्यू झाला.) दरम्यान, या दोन्ही महिला वेगवेगळ्या असताना एकाच कथित समाजसेवकाच्या संपर्कात होत्या. या दोन्ही महिलांना त्या व्यक्तीने मंत्रालयासमोर जाऊन विषप्राशन करा, असे सांगितले. पोलिस या कथित समाजसेवकाबद्दल अधिक माहिती घेत आहेत. डावरे यांची प्रकृतीही गंभीर आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पण प्रकृतीत सुधारणा नसल्याचे कळते.