26 C
Mumbai
Tuesday, November 26, 2024
घरक्राईमनामाधक्कादायक!! उपजीविकेसाठी महिला स्वतःच्याच मुलांना विकत होती

धक्कादायक!! उपजीविकेसाठी महिला स्वतःच्याच मुलांना विकत होती

Google News Follow

Related

जळगावमधील अमळनेरमधून मुलांना विकाण्याचा प्रयत्न करत असल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. विशेष म्हणजे संबंधित महिला ही आपल्याच पोटच्या मुलांची विक्री करत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, विक्री करताना पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले आहे. हिराबाई देवा गायकवाड (वय ४०) असे महिलेचे नाव आहे.

अमळनेर शहरात गांधलीपुरा भागातील सुभाष चौकात एक महिला काही मुलांची विक्री करत असल्याची माहिती पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी अधिक तपासासाठी पोलिस पथकाला महिलेचा शोध घेण्यासाठी पाठवले. या पथकाने संबंधित महिलेला गाठून तिची चौकशी केली असता महिला भांबावलेल्या अवस्थेत दिसून आली.

त्यानंतर पोलिसांनी या महिलेला आणि सोबतच्या तीन मुली व चार मुले यांना पोलिस ठाण्यात आणले. या महिलेची चौकशी केली असता सोबतची सातही मुले त्या महिलेचीच अपत्ये असल्याचे समोर आले. तिच्या पतीचा कोरोनाने मृत्यू झाल्याने तिच्याकडे उपजीविकेसाठी पुरेसे साधन नसल्याने ती स्वत:च्या मुलांची इच्छुक लोकांना विक्री करत होती, अशी माहिती समोर आली. मुलांना विकणे बेकायदेशीर असल्याचे सांगून तिला समज देण्यात आली.

हे ही वाचा:

राष्ट्रपतींवर केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर अधीर रंजन चौधरी यांच्यावर एफआयआर दाखल

राजस्थानमध्ये हवाई दलाचे विमान कोसळून दोन पायलट्सचा मृत्यू

शाब्बास.. १७ वर्षांखालील जागतिक कुस्तीत सूरज चमकला!

भ्रष्टाचारात लडबडलेले पार्थ चॅटर्जी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी

भविष्यात महिला मुलांना विकून टाकण्याची शक्यता असल्याने तीन मुली व चार मुलांना संरक्षण व पालनपोषणासाठी बालकल्याण समिती, जळगाव येथे हजर करून त्यांची रवानगी महिला बालसुधारगृहात करण्यात आली. या कारवाईवेळी पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, उपनिरीक्षक नरसिंग वाघ, पोलिस कर्मचारी नाजिमा पिंजारी, रवींद्र पाटील, दीपक माळी उपस्थित होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
199,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा