चर्चगेटमधील महिला वसतीगृहात तरुणीची बलात्कार करून हत्या

मरीन ड्राईव्ह पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे

चर्चगेटमधील महिला वसतीगृहात तरुणीची बलात्कार करून हत्या

छिल्लरच्या मते कोविड-१९ काळात महिलांवरील अत्याचारात वाढ.

चर्चगेट या ठिकाणी असणाऱ्या महिला वसतीगृहात चौथ्या मजल्यावर १८ वर्षीय तरुणीचा मृतदेह मंगळवारी दुपारी मिळुन आल्याने एकच खळबळ उडाली आहे.या तरुणीवर अतिप्रसंग करून तिची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून मरीन ड्राईव्ह पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तिच्या गळ्याभोवती दुपट्टा होता तर ती ज्या खोलीत राहात होती, त्याचा दरवाजा बाहेरून बंद होता.

बळीत तरुणी ही मूळची अकोला येथे राहणारी असून मुंबईत शिक्षण घेत होती,चर्चगेट येथील महिला वसतिगृहाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर राहत होती. मंगळवारी दुपारी तीचा मृतदेह पोलिसाना मिळून आला आहे, तीच्यावर अतिप्रसंग करून तिची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

हे ही वाचा:

काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकींची पत्रकाराला धमकी

पूल कोसळल्यानंतर आता काम सुरू असलेल्या रुग्णालय इमारतीला भेगा

बिहारमधील पडलेल्या पुलाची जबाबदारी असलेली सिंगला कंपनी निशाण्यावर

कुरापती चीनकडून अक्साई चीनपर्यंत रस्ते, कॅम्प, हेलिपॅड्सची उभारणी

अकोला जिल्ह्यात राहणारी ही तरुणी २३ जून रोजी गावी जाणार असल्याचे तीने काढलेल्या तिकिटावरून कळते. तीची हत्या कोणी केली याबाबत अद्याप काहीही कळू शकलेले नसून मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून वस्तीगृहातील कर्मचारी तसेच तिच्या मैत्रिणीकडे चौकशी करून त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात येत आहे.

Exit mobile version