केबीसीमध्ये हे अनेकांसाठी स्वप्न असते. त्यामुळेच या स्वप्नासाठी माणसं फोनकडे कान लावून बसतात. नुकतीच कफपरेडमध्ये देखील अशीच एक घटना घडली.
ही निव्वळ लुबाडण्याच्या उद्देशाने झालेली घटना होती. केबीसी लॉटरीच्या नावे कफ परेडमधील महिलेला जवळपास ४६ हजारांना गंडवले. कौन बनेगा करोडपती मध्ये २५ लाखांची लॉटरी या महिलेला चांगलीच भारी पडली. २४ वर्षीय महिलेने फसवले गेलोय हे लक्षात येताच, कफपरेड पोलीस ठाण्यात तक्रार केली.
महिलेचे पती हे टॅक्सीचालक असून, त्यावर यांचा चरितार्थ अवलंबून आहे. महिला कफपरेड येथील आई वडिलांच्या घरी असताना, विक्रम सिंग नामक व्यक्तीने फोन केला. फोन करून केबीसीमधून बोलतोय असे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना २५ लाखांची रक्कम लागल्याचे सांगण्यात आले. अनेक कारणे देऊन विक्रम सिंगने या महिलेचा विश्वास अखेर संपादन केला. त्यानंतर मात्र वेगळेच घडले.
या महिलेला लकी क्रमांक म्हणून तिच्या मोबाईलची निवड झाल्याची खात्री पटली. २५ लाखांची रक्कम हवी असल्यास याकरता नोंदणी म्हणून काही रक्कम द्यावी लागेल, असे सिंग याने संबंधित महिलेला सांगितले. त्यानंतर या महिलेने अंगावरील चेन विकून सुरुवातीला मागितलेली १२ हजारांची रक्कम देऊ केली. त्यानंतर विकीने काही ना काही कारणे देत आणखी पैशाची मागणी केली.
हे ही वाचा:
आता सहनशक्ती संपली! क्रांतिदिनी होणार आंदोलन
शास्त्रज्ञांनी प्रथमच टिपल्या ताऱ्याच्या मरणकळा!
राज्यात मान्सूनची दडी; खरीप हंगामावर परिणाम होण्याची शक्यता
पुण्यातील व्यापारी अधिक आक्रमक होणार?
प्रसंगी महिलेने शेजारी पाजारी यांच्याकडून उसने पैसे घेऊनही विकीची पैशाची मागणी पूर्ण केली. मिळणारे २५ लाख हातात आले की, सर्व काही व्यवस्थित आणि उत्तम होईल, अशी या महिलेची आशा होती. काही दिवसांनी विकीने अजून पैशांची मागणी केली, त्यावेळी मात्र महिलेने आधीचे पैसे दे असे म्हटले. त्यानंतर विकीने नंतर फोनच केलेला नाही, त्याच क्षणी आपण फसलोय हे महिलेला कळून चुकले. विकी नंतर गायब झाल्याने, महिलेला सर्व घडलेला वृत्तांत पोलिसांना सांगितल्याशिवाय काही पर्यायच उरला नव्हता.