27 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरक्राईमनामाकुमार सानूचे नाव घेत महिलेला क्रिप्टोकरन्सीपायी ४० लाखांना गंडवले

कुमार सानूचे नाव घेत महिलेला क्रिप्टोकरन्सीपायी ४० लाखांना गंडवले

आमिषाला बळी पडून उद्योजक महिलेचे ४० लाख रुपयांची फसवणूक.

Google News Follow

Related

बोरीवली येथील एका व्यावसायिक महिलेची कूटचलन म्हणजेच क्रिप्टोकरन्सी निर्मिती करणाऱ्या ऑस्ट्रेलियातील कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून ४० लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या संदर्भात तक्रारदार महिलेनी बोरीवली येथील कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने ५० लाख गुंतवणूक केल्यास दररोज दीड टक्के व्याज व मुद्दल देण्याचे आमिष दाखवले होते. तसेच विश्वास संपादन करण्यासाठी आरोपीने प्रसिद्ध पार्श्वगायक कुमार सानू देखील कंपनीत असल्याचे भासवले होते. असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

दीप साहू आणि बिमान दास यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोरीवली पूर्वेकडील रहिवासी असलेल्या तक्रारदार रितुपूर्णा मोहंती (३३) या त्यांच्या पतीसह औषधांचा व्यवसाय करतात. साहू हा त्यांचा मागच्या दोन वर्षापासुचा ग्राहक होता. साहू ने तक्रारदार महिलेला एप्रिल महिन्यात ऑनलाईन मिटिंगमध्ये दासने ऑस्ट्रेलियातील फ्लेमिंगो बिझनेस कंपनीचा मालक असल्याचा दावा केला. भारतात या कंपनीचा कार्यालय कोलकत्ता येथे असल्याचा सांगितले होते. पार्श्वसंगीत गायक कुमार सानू याचे लवकरच नॉन-फनजिबल टोकन (एनएफटी) देखील बाजरात येईल असे सांगितले होते.

कंपनीने बाजारात ६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तसेच ‘यो कोर्न’ आणि ‘फास्ट बीएनबी’ या आभासी चलनांची निर्मितीसुद्धा आमच्याच कंपनीने केली आहे. असा दावा दास यांनी केला. तक्रारदाराने १३ एप्रिल २०२२ रोजी झालेल्या ऑनलाईन बैठकीमध्ये गायक कुमार सानूही उपस्थित होते. मात्र ते काही बोलले नाहीत. बैठकीच्या शेवटला त्यांची एक चित्रफित दाखवण्यात आली. अशी महिती तक्रारदार महिलेनी दिली.

हे ही वाचा

‘सीएनजी’चा तुटवड्यामुळे प्रवाशांचा पंपावर खोळंबा

वाहन वितरणाने टाकला टाॅप गिअर

चिनी कट उधळला, व्हीएलसी मीडियावर बंदी

नुपूर शर्मांची हत्या करण्यासाठी आलेल्या दोन दहशतवाद्यांच्या आवळल्या मुसक्या

या बैठकीनंतर तक्रारदार महिलेने ४० लाख ४४ हजार रुपये गुंतवले. गुंतवलेली रक्कम मोबाईलवर पाहता येईल. असे तक्रारदार महिलेला सांगण्यात आले. मात्र महिलेला मोबाईलवर माहिती मिळत नव्हती. साहू यांना विचारले असता ५० लाख रुपये पूर्ण भरल्यानंतर लाभ मिळेल. बरेच दिवस साहू आणि दास यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला असता. कोणताही प्रतिसाद दिला नाही. अखेर तक्रारदार महिलेने कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता.त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
194,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा