रेतीबंदर खाडीत एक महिला पडल्यामुळे खळबळ उडाली पण त्या महिलेला वाचविण्यात यश आले. तिने आत्महत्येचा प्रयत्न केला का, यासंदर्भात आता तपास सुरू आहे. आज दिनांक २२ मे २०२१ रोजी सकाळी ०६:५३ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त तक्रारीनुसार जीओ टॉवर जवळ, मुंब्रा बायपास रोड, मुंब्रा येथे एक महिला रेतीबंदर खाडीमध्ये पडली होती. सदर घटनेची माहीती मिळताच घटनास्थळी मुंब्रा पोलिस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, ठा.म.पा. अग्निशमन दलाचे जवान १-फायर वाहन, १- रेस्क्युव्ह वाहन व १-बोट इत्यादीसह उपस्थित होते. सदर महिलेला रेतीबंदर खाडीमधून सुखरूप बाहेर काढून मुंब्रा पोलिस कर्मचारी यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
हे ही वाचा:
सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लागू करा
त्रिपुरातील फणस पोहोचणार लंडनला
राम-लक्ष्मण जोडीतील संगीतकार विजय पाटील कालवश
ठाकरे सरकारमध्ये इतका निबरपणा येतो कुठून?
सदर महिलेचे नाव ज्योती गुड्डू उपाध्याय (वय २८ वर्षे) असे असून या महिलेने पहाटे ५ वाजताच्या सुमारास स्वत: कशेळी खाडीमध्ये उडी मारली असून, तिला रेतीबंदर खाडीमधून बोटीच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. ज्याेती उपाध्याय या रूम नंबर-२०१, दुसरा मजला, रिद्धी-सिद्धी गँलक्सी टॉवर, काल्हेर, भिवंडी येथील रहिवासी आहेत.
ज्योती उपाध्याय ही महिला भिवंडीतील काल्हेर येथे भाडेतत्त्वावर राहते. पती उत्तरप्रदेशला असून पती-पत्नीमध्ये घरगुती वाद सुरू होता. काल या महिलेचा पतीसोबत फोनवर वाद झाला आणि ती रागातून घराबाहेर पडली. नंतर तिने खाडीत उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला, असे बोलले जात आहे. पोलिस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.कोरोनाच्या या काळात कौटुंबिक वादविवाद, समस्याही डोके वर काढत आहेत. त्यातून अशी घटना घडण्याची शक्यता असू शकते.